शिर्डी विमानतळावरून लवकर कार्गो सेवा सुरू करा - जिल्हाधिकारी

शिर्डी विमानतळावरून लवकर कार्गो सेवा सुरू करा - जिल्हाधिकारी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी विमानतळावरून (Shirdi Airport) लवकरात लवकर कार्गो सेवा (Cargo service)सुरू करण्याच्यादृष्टीने उपाययोजना करावी. तसेच विमान उड्डाणाची (Flight) संख्या वाढविण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी शिर्डी विमानतळाच्या (Shirdi Airport) अधिकार्‍यांना दिल्या.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (Maharashtra Airport Development Company Limited) यांच्यावतीने शिर्डी (Shirdi) येथील विमानतळ (Airport) आणि परिसराचे व्यवस्थापनासाठी पर्यावरण व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी (Collector) हे या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीची बैठक गुरूवार दि. 9 सप्टेंबर 2021 रोजी दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समितीच्या विविध कामांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते.

शिर्डी विमानतळ संचालक सुशीलकुमार श्रीवास्तव (Shirdi Airport Director Sushilkumar Srivastava) यांनी मागील बैठकीतील ठराव व प्राधिकरणाने केलेल्या कामांचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी (Collector) यांनी दिलेल्या सूचनेनुसार विमानतळ (Airport) परिसरात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये कचरा संकलन (Garbage collection) व विल्हेवाट प्रक्रिया (Disposal process) राबवण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंची व जिल्ह्याची माहिती दर्शविणारे फलक विमानतळ परिसरात उभारण्याचे काम चालू आहे. पोलीस चौकी स्थापन करण्यात आली आहे.

विमानतळाचा मुख्य भाग व परिसरामध्ये विविध प्रकारची कामे निरंतर सुरू आहेत. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परिसरात पशुपालन (Animal Husbandry) करणार्‍या पोल्ट्री फार्म (Poultry farm) चालकांना मृत्यू झालेल्या पक्षांचे विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. भोसले म्हणाले, सध्या जरी शिर्डी देवस्थान बंद असले तरी आजूबाजुच्या परिसरातील व्यापारी व शेतकर्‍यांच्या सोयीसाठी कार्गो सेवा सुरू करण्यात यावी. सध्या शिर्डी विमानतळ येथून 14 विमान उड्डाण फेर्‍या चालवल्या जातात. त्या फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात यावी. विमानतळ परिसर व्यवस्थापन सुकर व्हावे यासाठी नगरपंचायत आणि जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच विमानतळाच्या परिसरातून जात असलेल्या रस्ते व महामार्गाच्या डागडुजीच्या कामाकाजासाठी केंद्रीय व राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा करण्यात यावा. अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून शिर्डी विमानतळ टर्मिनल (Shirdi Airport Terminal) व्यवस्थापक एस. मुरली कृष्णा (S. Murali Krishna), सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट दिनेश दहीवाडकर, शिर्डी विमानतळ परिचालन व सुरक्षा अधिकारी पंढरीनाथ शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद म्हस्के, पशुसंवर्धन उपायुक्त सुनील तुंभारे, कोपरगाव गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, राहाता गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, कोपरगाव वन अधिकारी प्रतिभा सोनवणे, इंडिगो एअरलाईनचे शिर्डी स्टेशन व्यवस्थापक आशिष अब्राहम, स्पाईसजेट एअरलाईन कृष्णा शिंदे, शिर्डी विमानतळ परिचालन पर्यवेक्षक प्रांजली खवले, शिर्डी विमानतळाचे विद्युत व दूरसंचार सहाय्यक कार्यकारी अभियंता अजय देसाई, संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील व श्री.वरपे आदी अधिकारी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com