शिरसगावचा आठवडे बाजार पूर्ववत सुरु
File Photo

शिरसगावचा आठवडे बाजार पूर्ववत सुरु

पालिकेच्या नियमांची बाजारकरुंकडून पायमल्ली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शिरसगावचा (Shirasgav) बंद केलेला आठवडे बाजार (Weekly Market) प्रभाग 4 मधील आशीर्वादनगर भागात भरत आहे. काही महिने बाजारात (Market) मोठी गर्दी (Crowd) होत असल्याने नगरपालिका प्रशासनाने (Municipal Administration) बाजार बंद (Market Close) केला होता. त्यानंतर बाजारकरुंनी आपली जागा बदलत आशीर्वादनगर भागात रस्त्यावर पूर्ववत बाजार सुरु केला आहे.

करोनाची तिसरी लाट (Third Wave of Corona) येण्याची शक्यता व कॉलेजरोड या मुख्य रस्त्यावर बाजार भरत असल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाल्याने व अपघात (Accident) होण्याची शक्यता असल्याने या भागातील अनेक तक्रारी तहसीलदार (Tahsildar), प्रांताधिकारी व नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे गेल्या. त्यानंतर मागील मंगळवारी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने नगरपालिकेचे कर्मचारी पाठवून आठवडे बाजार बंद करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाने बाजार बंद केला होता.

काल मंगळवारी दिवसभर पाऊस असतानाही नगरपालिकेच्या सूचनेला न जुमानता परत आशीर्वादनगर येथे भरला. सोशल डीस्टेन्स न पाळता बाजार भरतो, ग्राहकही आता काही होत नाही, करोना महामारीची भीती संपली या अविर्भावात बिनधास्त बाजारात येतात.

नगरपालिकेच्या मंडईचे नुतनीकरण पूर्ण झाले असल्याने भाजीपाल्याचे विक्रेते यांनी नगरपालिकेच्या रस्त्यावर बसू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी सूचना पालिकेने दिलेली असताना त्याची कोणीही दखल घेत नाही. येत्या मंगळवारी बाजार भरण्याअगोदर तहसीलदार, प्रांताधिकारी, नगराध्यक्षा, नगरपालिका, पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या बाजार न भरणेसाठी कारवाई केल्यास शासनाच्या आदेशाची पायमल्ली होणार नाही. तशा सूचना संबंधिताना देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.