शिरसगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ चोरांच्या झटापटीत दोघे जखमी

शिरसगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ चोरांच्या झटापटीत दोघे जखमी

शिरसगाव |वार्ताहर| Shirasgav

श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे गुरुवारी पहाटे दोन ते तीन वाजेदरम्यान दोन तीन ठिकाणी चोरटे आले. त्यांनी काही जणांनी या चोरट्यांशी झटापटही होवून चांगलाच धुमाकूळ घातला. या झटापटीत दोनजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती. परंतु लोक जागे झाले, कुत्रे भूंकल्याने चोरांनी पळ काढला आणि त्यांचा चोरीचा प्रयत्न असफल ठरला.

शिरसगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ चोरांच्या झटापटीत दोघे जखमी
शिक्षिकेवर शिक्षकाचा अत्याचार

तालुक्यातील शिरसगाव येथे गुरुवारी पहाटे 2.15 वाजता चोर प्रथम शिरसगाव खंडोबा मंदिराजवळ राहत असलेल्या आनंद आचारी हे बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घराचे कडीकोंडा उचकटून घरात प्रवेश केला. यात एकूण पाच चोर असल्याचे प्रत्यक्षदर्शनी यांनी पहिले. आचारी आनंद यांच्या शेजारी राहणारे लोक जागे झाले. त्याचेवर दगडफेकही करण्यात आली. आचारी यांचे घरातील उचकापाचक करण्यात आली. पण घरातील काहीही सामान नेले नाही. तेथून चोरटे ब्राम्हणगाव रस्त्यावरील रवींद्र चांगदेव यादव यांच्या घराकडे पहाटे 3 वाजेदरम्यान आले. त्यांनी शेडमधील व इतर बल्ब काढून घेतले होते.

शिरसगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ चोरांच्या झटापटीत दोघे जखमी
नेवासाफाटा येथील तीन हॉटेलांवर पोलिसांचे छापे

घरातील एक महिला लघुशंकेसाठी बाहेर आली व ती घरात आली असता पाठोपाठ दारात चोर उभे दिसले व घरातील रवींद्र व किरण यांना सांगितले त्यांनी ढकलून बाहेर काढत प्रतिकार केला असता काठीने व गलोरीने दगड मारले असताना रवींद्र यांच्या पोटाला व किरण यांच्या डोक्याला मारहाण केल्याने दोघानाही जखमी केले. आईला पण दगड लागले. तेथेही चोरी करता आली नाही.चांगदेव यादव हे बाहेरगावी देवीची ज्योत आणणेसाठी गेले होते. तेथून चोरट्यांनी ताके वस्तीकडे सुनील ताके यांच्या वस्तीकडे गेले.

शिरसगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ चोरांच्या झटापटीत दोघे जखमी
मंत्रालयात दोन-तीन वेळा गेलेल्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये

तेथे कुत्रे भूंकल्याने सर्व जागे झाल्याचे समजले. तेथेही चोरीचा प्रयत्न सफल झाला नाही. एका ठिकाणी चोर चपला सोडून पळाले. चोरटे तलावाच्या, वसतीगृहाच्या बाजूने आले असावेत, असा अंदाज आहे. अशा प्रकारे चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिक भयभीत झाले आहे. पोलीस विभागाने गस्त वाढवून लक्ष घालावे. तसेच नागरिकांनी जागरूक राहून एकमेकांना मोबाईलव्दारे सूचना द्यावी. प्रथम पोलीस विभागाला फोन करावा. तासाभरात चोर निदर्शनास आले असते. शिरसगाव ब्राम्हणगाव परिसरातील नाग्रीकानो जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

शिरसगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ चोरांच्या झटापटीत दोघे जखमी
सत्तेचा दुरूपयोग केल्याचे सिध्द झाल्यास राजकारणातून संन्यास - आ. तनपुरे
शिरसगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ चोरांच्या झटापटीत दोघे जखमी
लोणी व्यंकनाथचे वादग्रस्त सरपंच अखेर अपात्र

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com