
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील 21 गुंठे शेती 2012 मध्ये पुण्यातील व्यक्तीस विक्री केलेली असताना तीच जमीन पुन्हा तलाठ्यांला हाताशी धरून तलाठ्यांचे सही शिक्के घेऊन दुसर्या व्यक्तीला विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शेती मालकावर फसवणुकीचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
आबासाहेब रामदास गोंटे (रा. शिरसगाव बोडखा, ता. श्रीगोंदा )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी बबन धोंडिबा चव्हाण (रा. एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार गोटे यांनी शेत गट नं.187/1 मधील 21 गुंठे जमीन 2012 मध्ये दुय्यम निबंधक यांचे समोर खरेदीखत करून चव्हाण यांना विक्री केली होती. चव्हाण हे पुणे येथे रहात असल्याने सदर शेतीची नोंद मी करतो, असे खोटे सांगून सदर शेतीची नोंद न करता तत्कालीन कामगार तलाठी यास हताशी धरून त्याचे सही शिक्क्याचे दोन वेळेस खोटे सातबारा उतारे चव्हाण यांना देण्यात आले. सदर शेती खरेदी दिले नंतरही त्याचेच नावे ठेवून सदर शेती सुरेश भाऊ निंभोरे (रा. घोटवी, ता. श्रीगोंदा) यांना 27 सप्टेंबर 2022 विक्री करण्यात आली. चव्हाण यांनी दिवाणी न्यायालयात तक्रार केल्यानंतर न्यायालयाने 156/3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.