शिरसगाव पाणी योजनेच्या तलावाचे पिचिंग ढासळले

वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाहणी करावी- सरपंच गवारे
शिरसगाव
शिरसगाव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील शिरसगाव (Shirasgav) येथील जलस्वराज्य टप्पा 2 अंतर्गत पिण्याच्या पाण्याची योजनेचे काम सुरू असून साठवण तलावाचे भराव व दगड पिचींगचे काम अंतिम अवस्थेत असताना काल श्रीरामपूर तालुका तसेच शिरसगाव भागात झालेल्या मुसळधार पावसाने तलावाचे दगडी पिचिंग (Pond Stone pitching) ढासळले. तसेच योजनेच्या खालच्या भागातील बिमही तुटला आहे.

यामुळे सरपंच आबासाहेब गवारे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत या योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी (Direct inspection) केली. तलावाचे दगडी पिचिंग व बीम तुटल्याने या निकृष्ट कामाबद्दल शंका व्यक्त करून दुरुस्ती करणेबाबत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अहमदनगर यांनी समक्ष पाहणी करून संबंधित कामाची चौकशी करावी, अशी मागणी सरपंच आबासाहेब गवारे यांनी केली आहे.

सदर योजना ही ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी (Drinking Water) असून नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने महत्त्वाची असल्याने या कामामध्ये कोणाचीही गय करणार नसल्याचे सरपंच आबासाहेब गवारे यांनी सांगितले. तरी लवकरात लवकर प्रशासनाने या कामासंदर्भात वरिष्ठ स्तरातून पाहणी करून त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी शिरसगाव ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com