
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहराजवळ असणार्या शिरसगाव हद्दीतील एस कॉर्नर येथील घराचा कडी-कोयंडा तोडून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
श्रीरामपूर शहराजवळ असणार्या शिरसगाव हद्दीतील एस कॉर्नर येथे राहणार्या सुवर्णा रामदास सोळसे यांच्या राहत्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातील 15 हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी व काही रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सुवर्णा रामदास सोळसे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.