शिरसगावात भरदिवसा घरफोडी

साडेनऊ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 23 हजार लंपास
शिरसगावात भरदिवसा घरफोडी

नेवासा |तालुका वार्ताहर|Newasa

नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना काल घडली.

साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने व 23 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत खासगी नोकरीस असलेले अभियंता अमोल वसंत होले (वय 28) रा. शिरसगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 चे सुमारास मी, आई, वडील व पत्नी असे आमच्या मामाचे वर्षश्राद्ध असल्याने कांगोणी (ता. नेवासा) येथे गेलो होतो.

तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आमच्या घरी शिरसगाव येथे परत आल्यानंतर मी माझेकडील चावीने घराचा दरवाजा उघडला व घरामध्ये पाहिले असता मला घरातील मधला दरवाजा तसेच आमच्या घरामागील दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर मी बेडरुममध्ये गेलो असता तिथेही घरातील कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची खात्री झाली.

मागील दरवाजचा कडी-कोयंडा तोडून घरात घुसून 23 हजार रुपयांची रोख रक्कम (500 रुपयांच्या 46 नोटा) साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने (राणीहार, नेकलेस, गंठण, अंगठी व लहानबाळाचे दागिने आदी) या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com