शिरसगाव पाणीपुरवठा स्वच्छता समिती सदस्यांचे राजीनामे

शिरसगाव पाणीपुरवठा स्वच्छता समिती सदस्यांचे राजीनामे

शिरसगाव |वार्ताहर| Shirasgav

शिरसगाव (Shirasgav) येथील योजनेचे काम करणारी एजन्सी (Agency working on the scheme), ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा स्वच्छता समितीला (Maharashtra Jeevan Pradhikaran Water Supply Sanitation Committee0 विश्वासात घेत नाही. तसेच समितीच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने समितीच्या पदाधिकार्‍यांनी पदाचे राजीनामे (office bearers resigned) दिले आहेत.

शिरसगाव (Shirasgav) येथील 13 कोटी रुपये खर्चाच्या जलस्वराज 2 (Jalaswaraj 2) या पाणीपुरवठा योजनेच्या नियोजनासाठी (Planning of water supply scheme) जिल्हा परिषद अहमदनगर (jilha Parishad Ahmednagar) यांच्या आदेशानुसार शिरसगाव येथे ग्रामसभेत पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांंची निवड करण्यात आली होती (The chairman, secretary and members of the water supply and sanitation committee were elected). या नियोजन समितीवर जलस्वराज 2 पाणीपुरवठा योजनेवर देखरेख ठेवणे, नियोजन करणे, कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे तसेच वेळोवेळी बैठका घेऊन नियोजन करण्याची जबाबदारी आहे.

या योजनेचे काम सुरू असताना काम करणारी एजन्सी, ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समितीला विश्वासात घेत नाही. समितीच्या सूचनेकडे दुर्लक्ष (Ignore instructions) केले जाते. योजनेचे काम एक वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु चार ते पाच वर्षे झाली तरी बरेच काम अपूर्ण आहे. कामाची गुणवत्ता समाधानकारक नाही (The quality of work is not satisfactory). गेल्या चार वर्षात एकही बैठक घेतली नाही. पहिल्या पावसात तलावाची 200 मीटर भिंत खचली असताना बैठक नाही. तलावाच्या कडेने काँक्रिटचा थरसुद्धा खचला आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

200 मीटर भिंत खचली असताना तिची दुरुस्ती न करता तलावात (Pond) पाणी सोडण्यात आले. या सर्व बाबींचा विचार करून समितीवर काम करणे योग्य वाटत नसल्याने पाणीपुरवठा स्वच्छता समिती अध्यक्ष नितीन बाबासाहेब गवारे (Nitin Babasaheb Gavare), सचिव सुनंदा जाधव (Sunanda Jadhav) व सदस्य शोभा दुशिंग, आरती बकाल, दीपक जाधव, निलेश यादव, सुनीता बकाल, सायरा शेख, ज्योती ताके, मनीषा गोलवड या पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचे राजीनामे ग्रामविकास अधिकारी यांचेकडे सदर केले (ffice bearers submitted their resignations to the Village Development Officer) आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com