
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील शिराळ येथील जमिनीच्या वादातून झालेल्या खुनातील संशयित पतीपत्नीस ाथर्डी पोलिसांनी अटक करून पोलिसांनी पाथर्डी न्यायालयात हजर केले. न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर या दोघांनाही तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायाधीश मयुर गौतम यांनी दिले.
हनुमंत ज्ञानदेव घोरपडे व रोहिणी हनुमंत घोरपडे(रा. शिराळ, ता. पाथर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. तालुक्यातील शिराळ येथे रविवारी जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत पोपट लक्ष्मण घोरपडे खून झाल्याची घटना घडली होती.पोपट घोरपडे व ज्ञानदेव घोरपडे यांच्यात जमिनीच्या वादातून गावातली दुर्गा माता मंदिराजवळ रविवारी अकरा वाजण्याच्या सुमारास वाद झाला.
त्यानंतर लोखंडी गजाने पोपट घोरपडे यांना जबर मारहाण करण्यात आली. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला.प्रतापराव रामराव घोरपडे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानदेव गणपतराव घोरपडे, दत्तात्रय ज्ञानदेव घोरपडे, हनुमंत ज्ञानदेव घोरपडे, अंजू घोरपडे. (पूर्ण नाव माहिती नाही.),रोहीणी हनुमंत घोरपडे सर्व रा.शिराळ (चिचोंडी.) या पाच जणाविरुद्ध पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी हनुमंत ज्ञानदेव घोरपडे, रोहिणी हनुमंत घोरपडे या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली.