धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाचा खून

कुठे घडली घटना ?
धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाचा खून

करंजी |वार्ताहार| Karanji

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील शिराळ (Shiral) येथे रविवारी दुपारी जमिनीच्या वादातून (Land Dispute) झालेल्या मारहाणीत (Beating) एकाचा खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे. शिराळ येथे पोपट लक्ष्मण घोरपडे (वय 52) व हनुमंत घोरपडे यांच्यात जमिनीच्या वादातून (Dispute) दुर्गा माता मंदिराजवळ रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वाद (Dispute) झाला. हाणामारीत पोपट घोरपडे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाचा खून
कोपरगाव उपकारागृहात शस्र पुरवताना एकास अटक

शिराळमध्ये हाणामारीत एकाचा खून (Murder) झाल्याची घटना समजताच शेवगाव पाथर्डीचे प्रभारी डीवायएसपी अनिल कातकाडे, (DYSP Anil Katkade), पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, रामेश्वर कायंदे, सचिन लिमकर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मारहाणीत एकाचा खून झाल्याने शिराळमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलीस प्रशासनाकडून या घटनेबाबत अधिक तपास करण्याचे काम सुरू झाले आहे.

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाचा खून
अहिल्यादेवींच्या नावाने नामांतराचे स्वागत करू

गावात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस हवालदार विजय भिंगारदिवे, अनिल बडे, आप्पासाहेब वैद्य,पोपट आव्हाड, राजेंद्र सुद्रिक, सचिन मिरपगार, देविदास तांदळे यांच्यासह पोलीस कर्मचारी शिराळमध्ये ठाण मांडून आहेत. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल (Filed a Case) झालेला नव्हता.

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाचा खून
'गंगामाई'च्या इथेनॉल प्रकल्पातील भीषण आगीचं कारण आले समोर
धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाचा खून
अंगणवाडी सेविका भरतीसाठी नगरमध्ये हालचाली
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com