शिंगवे ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे विरुद्ध ‘आ. काळे-आ. विखे’ गटात तुल्यबळ लढत

शिंगवे ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हे विरुद्ध 
‘आ. काळे-आ. विखे’ गटात तुल्यबळ लढत

सावळीविहीर (वार्ताहर) -

राहाता तालुक्यातील शिंगवे ग्रामपंचायतीच्या सन 2021 -2025 च्या निवडणुकीत काल अर्ज माघार घेण्याच्या अखेरपर्यंत तेरा जागांसाठी

सत्ताविस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज ठेवल्याने कोपरगाव विधानसभा चे माजी आ.स्नेहलता कोल्हे विरुद्ध विद्यमान आ.आशुतोष काळे व आ.राधाकृष्ण विखे पाटील गटामध्ये प्रमुख तुल्यबळ लढत होणार असून प्रभाग एक मधे अपक्ष उमेदवार हर्षद विलास चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.

माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे गटाचे नेतृत्व उपसरपंच राजाराम काळे तर काळे-विखे पाटील गटाचे नेतृत्व माजी सरपंच भाऊसाहेब जाधव, सुभाष चौधरी, बाबासाहेब कवडे, प्रमोद चौधरी हे करत आहे. प्रभाग एक निवडणूक चुरशीची होणार प्रभाग एक मधे अपक्ष उमेदवार हर्षद विलास चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या प्रभाग एक मधे अपक्ष उमेदवार मुळे य् प्रभागातील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

उमेदवार पुढील प्रमाणे. प्रभाग 1-बबन शंकर पगारे, सिताराम भिमा पगारे (अनुसूचित जाती पुरुष) दिलीप विलास चौधरी, विकास ज्ञानदेव चौधरी, हर्षद विलास चौधरी (अपक्ष) (जनरल पुरुष) स्वाती तुकाराम चौधरी, सोनाली विकास कवडे. प्रभाग 2- रविंद्र नवनाथ बर्डे, हरी रोडीबा माळी (अनु.जमाती पुरुष), शोभा प्रल्हाद बरवंट, मनिषा सोमनाथ पठारे (ईमाव स्रि,) मिना प्रभाकर सुराळकर, सैबाज आली (शेख जनरल स्रि) प्रभाग 3- प्रशांत शिवाजी काळवाघे, रामकृष्ण भागवत चौधरी( ईमाव पुरुष) कल्पना संजय ठोंबरे, मोनाली पोपट चौधरी(जनरल स्रि) प्रभाग 4- राजाराम काशीनाथ काळे,किसन नाना ठोंबरे (जनरल पुरूष ) माया संतोष पगारे, पगारे सुशीला सुदाम (अनु.जाती. महिला) अनिता राजेंद्र बाभूळके, अश्विनी देवानंद बाभूळके ईमाव महिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com