
सोनई |वार्ताहर| Sonai
जवळील पानसनाला परिसरात शनिशिंगणापूर पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेसात वाजता सात जनावरे कत्तलखान्यात घेऊन जात असलेला पिकअप पकडला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की पानमसाला परिसरात 15 हजार रुपये किमतीची दहा वर्षे वयाची तांबड्या रंगाची दोन शिंगे असलेली गाय, 15 हजार रुपयांची दहा वर्षे वयाची पांढर्या रंगाची दोन गोलाकार शिंगे असलेली, 6 हजार रुपयाची दीड वर्षाचा पांढर्या रंगाचा गोर्हा, 4 हजार रुपयाचा पांढर्या रंगाचा गोर्हा, 3 हजार रुपयांचा एक वर्षाचा पांढरे व तांबड्या रंगाचा पट्टा असलेल्या गोर्हा, 3 हजारांचा एक वर्षे वयाचा काळा व पांढरा रंगाचा गोर्हा, 3 लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा पिक अप क्रमांक एम एच 16 सीसी 8759 पकडली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ यांच्या फिर्यादीवरून शहानवाज अश्फाक शेख वय 32 व मतीन पीर मोहम्मद शेख दोघेही रा. संदेश नगर वसंत तेकडी सावेडी अहमदनगर याचे विरुद्ध शिंगणापूर पोलीस ठाण्यात 69/ 2022 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे 5 ब प्राण्यांना कृतीने वागण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 मोटार वाहन कायदा 192 प्रमाणे जनावरे अत्यंत कमी जागेत आखूड दोरखंडाने असुरक्षित गळ्याला व तोंडाला बांधलेले त्यांना उभे राहण्यास पुरेशी जागा नसताना त्यांना हालचाल करता येणार नाही त्यांना अन्न पाण्याची सोय व देखभाल न करता क्रूरतेने दाटीवाटीने बांधून त्यांची कत्तल करण्यासाठी मांस विक्रीकरिता वाहतूक करून घेऊन जात असताना मिळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक फुलमाळी हे पुढील तपास करत आहेत. याकामी पोलीस हवालदार माळवे, पोलीस शिपाई वाघ, पोलीस शिपाई टकले, चालक मस्के हे कारवाईत सहभागी होते.