शिबलापुरात विवाहितेचा खून, अंगणात अंत्यसंस्कार

आश्वीत 6 जणांवर गुन्हा, पाच ताब्यात
शिबलापुरात विवाहितेचा खून, अंगणात अंत्यसंस्कार

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथिल आरती राजेंद्र मुन्तोडे (वय - 35) या महिलेचा मृतदेह सोमवारी सकाळी आश्वी खुर्द येथिल प्रवरा उजव्या कालव्यात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी महिलेच्या पतीसह सासरच्या मंडळीवर 302 व 498 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही महिला दोन दिवसापासून बेपत्ता होती व तिचाच मृतदेह सापडल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.

सोमवार दि. 30 मे रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास आश्वी खुर्द येथिल डाव्या कालव्यामध्ये एक मृतदेह तरगंत असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. घटनेचे गाभिर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह कालव्यातून बाहेर काढला व तो मृतदेह शिबलापूर येथील बेपत्ता असलेल्या आरती राजेंद्र मन्तोडे यांचा असल्याची खात्री केली.

मृतदेह सापडल्याची माहिती माहेरकडील नातेवाईकांना कळाल्यानतंर त्यानी आश्वी पोलीस ठाणे येथे पतीसह सासरकडील मंडळीवर खूनाचा संशय घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी पोलीसांनी उपस्थित नातेवाईकांशी संवाद साधत मयत महिलेचा मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात पाठवला होता.

यानंतर मयत महिलेचा पार्थिव हा अंत्यविधी करण्यासाठी शिबलापूर येथे आणला असता महिलेच्या नातेवाईकांनी अंत्यविधी हा घरात करण्याची मागणी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी ग्रामस्थ व पोलीसांनी नातेवाईकांशी संवाद साधत घराच्या अंगणात तणावपूर्ण वातावरणात अंत्यविधी करण्यात केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक सुभाष भोये, साहय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, साहय्यक फौजदार तात्याराव वाघमारे, पोलीस हवालदार दीपक बर्डे, प्रसाद सोनवणे, विनोद गंभिरे, रविद्रं भाग्यवान, पोलीस नाईक प्रदीप साठे, हुसेन शेख, निलेश वर्पे, आनंद वाघ, प्रवीण रणधीर, महिला पोलीस ताराबाई चांडे याच्यासह पोलीसाचा मोठा फौजफाटा तैनात होता.

दरम्यान, आश्वी पोलिस ठाण्यात पती राजेंद्र यशंवत मुन्तोडे, दीर रविद्रं यशंवत मुन्तोडे, जाव रंजना रविंद्र मुन्तोडे, सासु अलका यशंवत मुन्तोडे (सर्व रा. शिबलापूर, ता. संगमनेर), नंदई प्रकाश सखाराम गायकवाड व ननंद शिला प्रकाश गायकवाड (दोन्ही रा. पोखरी हवेली, ता. संगमनेर) यांच्याविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 81/2022 नुसार भादंवि कलम 302, 498(अ), 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक सुभाष भोये हे पुढील तपास करत आहेत. तर 5 जणाना पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com