शिबलापूर-माळेवाडी शिवारात बिबट्याचा मुक्त वावर

शिबलापूर-माळेवाडी शिवारात बिबट्याचा मुक्त वावर

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील शिबलापूर - माळेवाडी (Shibalapur-Malewadi) शिवारातील रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिनधास्त वावर करणारा बिबट्या (Leopard) येथिल सुरज गणपत सांगळे याने आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केला असून हा व्हिडीओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात वायरल (Video Viral) झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरीकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी (4 ऑगस्ट) संध्याकाळी 8.30 वाजेच्या सुमारास संदीप विठ्ठल म्हस्के व सुरज गणपत सांगळे हे दोघे चारचाकी वाहनातून शिबलापूर- माळेवाडी रस्त्याने शेडगावकडे चालले होते. यावेळी निर्जनस्थळी गाडीच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला त्यांना हालचाल दिसली. त्यामुळे त्यांनी गाडीच्या प्रकाशात पाहिले असता शिकारीच्या (Hunter) शोधात निघालेला बिबट्या (Leopard) त्याच्या नजरेस पडला. हा बिबट्या (Leopard) गाडीकडे बघून गुरगुरत असल्याने गाडी हळूहळू पुढे घेण्यास त्यांनी सुरवात केली असता बिबट्या (Leopard) रस्त्याने चालत जात पुढे अंधारात गुडुप झाल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान बिबट्या (Leopard) दिसलेल्या जागेपासून हक्केच्या अतंरावर अनेक वस्त्या असल्याने स्थानिक नागरीकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com