बाहेरचा ऊस आणल्यास शेतकर्‍यांचा उद्रेक होईल

हर्षदा काकडे यांचा ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात साखर कारखानदारांना इशारा
बाहेरचा ऊस आणल्यास शेतकर्‍यांचा उद्रेक होईल

शेवगाव (तालुका प्रतिनिधी)

कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे अगोदर गाळप करा. त्याशिवाय बाहेरचा ऊस कारखान्यांनी आणू नये, अन्यथा शेतकर्‍यांचा उद्रेक पाहायला मिळेल असा इशाराच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदाताई काकडे यांनी दिला आहे.

शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे शुक्रवारी (दि.7) ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. शिवाजीराव काकडे होते. यावेळी हर्षदा काकडे म्हणाल्या, मागील वर्षी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ऊस तोडणीसाठी एकरी 10 ते 15 हजार रुपये द्यावे लागले. शिवाय काहींचा ऊस पेटवून तोडण्याची वेळ आली.

तोडणीस उशीर झाल्यामुळे उत्पादनात घट झाली. कारखान्यांनी अशाप्रकारे शेतकर्‍यांना लुबाडण्याचे काम केले, शेतकरी मोडून काढण्याचे काम केले. कारखान्यांची उभारणी या तालुक्यासाठी झालेली असताना व शेतकरी सभासद असतानाही कारखानदारांनी अगोदर बाहेर तालुक्यातील उसांना प्राधान्यक्रम दिला. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना ऊस तोडणीसाठी वाट पहावी लागली व परिणामी तोडणीसाठी पैसेही द्यावे लागले. त्यामुळे चालू हंगामात कारखान्यांनी अगोदर कार्यक्षेत्रातील उसाचे संपूर्ण गाळप करावे. बाहेरच्या उसाचे एक टिपरू देखील शेतकरी आणू देणार नाहीत.

अ‍ॅड.काकडे म्हणाले, सर्व ऊस उत्पादकांसमोर कार्यक्षेत्रातील उसाची प्रथम तोडणी झाल्याशिवाय कार्यक्षेत्राबाहेरील ऊस साखर कारखान्यास गळतीसाठी आणू नये. मागील वर्षीच्या ऊस गळीत हंगामामध्ये ऊस तोडणीसाठी शेतकर्‍यांना जे पैसे द्यावे लागले ते पैसे परत मिळावेत. 2022-23 च्या ऊस गळीत हंगामामध्ये शेतकर्‍याकडून ऊस तोडणीसाठी पैसे घेण्यास कारखान्याकडून प्रतिबंध करावे व तसे झाल्यास ते पैसे कारखान्याने संबधित ऊस उत्पादक शेतकर्‍यास परत द्यावे. यावेळी सर्वांनी मारुती रायाच्या मंदिरामध्ये मी ऊस तोडणीसाठी पैसे देणार नाही अशी शपथ घेतली.

यावेळी जगन्नाथ गावडे, उदय बुधवंत, कॉ.राम पोटफोडे, नामदेव सुसे, राम शिदोरे, भाऊसाहेब सातपुते, प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगरे, शाम खरात, भाऊसाहेब पोटभरे, रमेश दिवटे, राजेंद्र उगलमुगले, यांची भाषणे झाली. यावेळी आबासाहेब राऊत, राजू पातकळ, भाऊसाहेब राजळे, लक्ष्मण पातकळ, गणेशराव आहेर, रामभाऊ साळवे, प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगरे, अशोक भोसले, प्रहारचे राम शिदोरे, शामजी खरात, देविदास गिर्हे, बबनराव पवार, बाबासाहेब देवढे, शंकरराव भालसिंग, रामनाथ काळे, तुकाराम कापरे, साहेबराव नजन, रावसाहेब वडणे, रामनाथ विखे, बाळासाहेब जाधव, राम मुंगसे, मधुकर फटांगरे, गोरक्ष बडे, मधुकर गोरे, लक्ष्मणराव टाकळकर, विजय लेंडाळ, उदय बुधवंत, भगवान डावरे, बाळासाहेब मरकड, ज्ञानेश्‍वर फसले, वैभव पूरनाळे, ज्ञानदेव पूरनाळे, विष्णू पूरनाळे, मल्हारी आव्हाड, शंकर देवढे, ज्ञानेश्‍वर आढाव, रामनाथ आढाव, सारंगधर उगले, रवींद्र राशिनकर, ज्ञानेश्‍वर उगले आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com