Crime News : शेतकऱ्याने केले नको ते धाडस, पोलीस पोहचले थेट शेताच्या बांधावर अन्….

Crime News : शेतकऱ्याने केले नको ते धाडस, पोलीस पोहचले थेट शेताच्या बांधावर अन्….

शेवगाव | शहर प्रतिनिधि

मोसंबीच्या बागेत चक्क गांजाची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी शेतकऱ्याने १२९ गांजाची झाडं लावली होती, या प्रकरणाची माहिती मिळताच शेवगाव पोलिसांनी शेतात छापा मारत शेतकऱ्याला अटक केली आहे. शेवगाव तालुक्यातल्या आखतवाडे या गावात ही घटना घडली आहे. अरुण बाजीराव आठरे (४४) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवगाव ठाण्याचे परिविक्षाधीन अधिकारी रेड्डी यांना आठरे यांनी मोसंबीच्या बागेत गांजाची झाडे लावल्याची माहिती मिळाली होती. खात्री झाल्यानंतर पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सपोनी विश्वास पावरा, आशिष शेळके पोहेकॉ परशुराम नाकाडे, बडे, उमेश गायकवाड, सुजित सरोदे, सुनील रत्नपारखे, सचिन खेडकर, कनाथ गर्कल, वैभव काळे महिला पोकॉ रूपाली कलोर यांचे पथक तयार करून पंचा समक्ष तेथे छापा टाकण्याचे आदेश दिले .

Crime News : शेतकऱ्याने केले नको ते धाडस, पोलीस पोहचले थेट शेताच्या बांधावर अन्….
...अशांना आम्ही श्रद्धांजली वाहतो; नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊत हे काय बोलून गेले..

त्यानुसार पथक तहसीलदार राहुल गुरव, वजन मापे निरीक्षक अनुप कुलकर्णी यांच्यासह दोन शासकीय पंच फोटोग्राफर यांना सोबत घेऊन आठरे यांच्या गट क्रमांक १५६ मध्ये गेले असता तेथे मोसंबीच्या बागेमध्ये गांजाची झाडे लावली असलेचे आढळून आले. याबाबत आठरे यांनी झडतीस नकार दिला असता पोलीस निरीक्षक पुजारी यांनी समज पत्र देऊन झडती घेतली. यावेळी तेथे तब्बल १२९ गांजाची झाडे आढळून आली. या झाडांचे वजन मापे निरीक्षक कुलकर्णी यांच्या समक्ष इलेक्ट्रिक काट्यावर वजन केले असता ते ११३ किलो भरले. पोलिसांनी ती जप्त केली .पोहेकॉ परशुराम नाकाडे यांच्या फिर्यादीवरून आठरे यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्या गुन्हा दाखल केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com