मारहाणीच्या दहशतीतुन वृद्धाची आत्महत्या

अपहरण करून बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
मारहाणीच्या दहशतीतुन वृद्धाची आत्महत्या
आत्महत्या

शेवगाव ( तालुका प्रतिनिधी)

गाडीने कट मारल्याचा जाब विचारल्याने प्रथम शिवीगाळ व नंतर दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणुन गाडीमधून पळवून नेत वृद्धाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. या दहशहतीला घाबरुन वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथे घडली.या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकेश मानकर, रुपेश मानकर व मच्छिंद्र धनवडे (सर्व रा. गदेवाडी, ता. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. तर विनायक किसन मडके (65, रा. गदेवाडी, ता. शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील विनायक किसन मडके हे आठ दिवसापूर्वी घोड्यावरून आपल्या शेतात चालले असता फॉर्च्यूनर गाडीतून जाणार्‍या मुकेश मानकर, रुपेश मानकर व मच्छिंद्र धनवडे या तिघा संशयितांनी गाडीद्वारे त्यांना कट मारला होता. त्यावेळी विनायक मडके यांनी याचा जाब विचारला असता संशयित तिघांनी शिवीगाळ केली होती.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी विनायक मडके हे गदेवाडी गावात गेले असता पुन्हा संशयित तिघांनी त्यांना दारुसाठी पैसे मागत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. 9 सप्टेंबर रोजी रात्री संशयित यांनी फॉर्च्यूनर गाडी क्रमांक 2223 मधून येऊन विनायक मडके यांचे अपहरण करून घेऊन गेले होते. त्यांचा मुलगा तुळशिराम मडके याने भावाला फोन करून शोध घेतला असता विनायक मडके यांनी हॉटेल सुयोगच्या पाठीमागे असलेल्या बोरीच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले.

याप्रकरणी तुळशिराम विनायक मडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकेश संशयित तिघांवर भादंवि कलम 306, 364, 385, 279, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शेवगावचे पो.नि. प्रभाकर पाटील हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com