एका लग्नाची जगावेगळी गोष्ट! नवरी पळाली भुर्रर्र...नवरा पाहतच राहिला

दागिने आणि रोकड घेऊन पोबारा
एका लग्नाची जगावेगळी गोष्ट! नवरी पळाली भुर्रर्र...नवरा पाहतच राहिला

शेवगाव | शहर प्रतिनिधी

मुला मुलीच्या संख्येतील विषम प्रमाणामुळे अनेक मुलांच्या लग्नाचा प्रश्न बिकट बनलाय. नेमक्या या अडचणीचा फायदा काही जण उठवत असल्याच्या अलीकडे अनेक घटना घडत आहेत. काहींचा तर लग्नाची मुले शोधून त्या कुटुंबास गंडा घालवण्याचा व्यवसाय बनला आहे.

तालुक्यातील कोळगाव येथील एका बापाला त्याच्या मुलासाठी सोयरीक दाखवून मुलीला आई-वडील नसल्याने तिचा सांभाळ करणाऱ्या तथाकथित मावशीला व मध्यस्थाला चक्क दोन लाख मोजावे लागले. नवरी मुलाच्या घरी आल्यावर घरातील रोख तीस हजार रुपये व ३० हजाराचे १२ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण साठ हजाराला गंडा घालून नवरीने घरातून भल्या पहाटे पोबारा केल्याची घटना घडली.

एका लग्नाची जगावेगळी गोष्ट! नवरी पळाली भुर्रर्र...नवरा पाहतच राहिला
...तर त्यांची सुंता झाली असती; अजित पवारांवर टीका करताना पडळकरांची जीभ घसरली

या संदर्भात मुलाचे वडील पंडित रामभाऊ कोरडे (वय ५५ रा . कोळगाव ता. शेवगाव) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दोन लाख साठ हजार रुपये फसवणुकीची तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आमच्या परिचित असलेल्या पिचडगाव (ता. नेवासा) येथील संभाजी नानासाहेब ब्राह्मणे याने मुलगा नितीन याचे साठी नगर तालुक्यातील जेऊर येथील दीक्षा महादेव कदम या मुलीचे स्थळ सुचविल्याने दि. २० जानेवारी ला दुपारी मुलगा नितीन सह गौतम दिलीपराव खंडागळे, यशवंत लक्ष्मण बोरडे,अशोक दळवी असे बायजाबाई जेऊरला गेलो .

एका लग्नाची जगावेगळी गोष्ट! नवरी पळाली भुर्रर्र...नवरा पाहतच राहिला
अबुधाबीहून केरळला येणाऱ्या Air India च्या विमानाला हवेतंच लागली आग अन्...

तेथे संभाजी ब्राह्मणे याने आम्हाला जेऊर गावातून ससेवाडी रोडने एका वस्तीवर पत्र्याच्या घरासमोर नेले. तेथे नवरी दीक्षा हीची गुरु आजी रहात असल्याची माहिती दिली. तिथे मुलगी दीक्षा व तिची बहीण, तिची मावशी मीराबाई जाधव होत्या. आम्ही मुलगी पाहिली असता मुला मुलीची पसंती झाली. त्यावर मुलीची मावशी मीराबाई जाधव हिने मुलीला आई-वडील नाही, तिला लहानाचे मोठे केले आहे. आम्ही काही मोठे लग्न लावणार नाही.

तुम्ही तिची माळ घालून लागलीच लग्न करून घेऊन जा .असे सांगितल्याने आम्ही सर्वांनी विचार करून सायंकाळी साडेपाचचे सुमाराला लग्नाचा कार्यक्रम आटोपून मुलगी दीक्षा तिची मावशी मीराबाई तिची बहीण यांचे सह कोळगावला आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी संभाजी ब्राह्मणे याने, मीराबाईने दीक्षाला लहाणाचे मोठे केले. त्या बदल्यात संगोपण खर्च म्हणून तुम्ही तिला दोन लाख रुपये द्या असे सांगितले.

एका लग्नाची जगावेगळी गोष्ट! नवरी पळाली भुर्रर्र...नवरा पाहतच राहिला
“उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, पण...”; शिंदे गटाच्या बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

यावर आम्ही मुलाच्या भविष्याचा विचार करून मीराबाई हीस दोन लाख रुपये देण्यास कबूल झालो. दुसऱ्या दिवशी दिनांक २१ ला चापडगाव येथून चुलती शोभा यशवंत गोरडे यांच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून पन्नास हजार रुपये व घरातील पन्नास हजार रुपये असे एक लाख रुपये मीराबाई जाधव हिला गौतम दिलीपराव खंडागळे, यशवंत लक्ष्मण बोरडे, अशोक दळवी यांचे समक्ष दिले.

त्यानंतर दिनांक २६ जानेवारीला मिराबाई जाधव व संभाजी ब्राह्मणे शेवगावच्या स्टँडवर आले असता मिराबाई कडे ५० व ब्राहमणेकडे ५० असे आणखी एक लाख रुपये दिले. त्यानंतर दिनांक २७ जानेवारीला पहाटे ४ चे सुमारास मुलगी दिक्षा गायब झाली. शोधाशोध करतांना घरात ठेवलेले ३० हजार रूपये रोख व ३०हजाराचे १२ ग्रॅम सोन्याचे दागिने ती घेऊन गेल्याचे लक्षात आले.

एका लग्नाची जगावेगळी गोष्ट! नवरी पळाली भुर्रर्र...नवरा पाहतच राहिला
विजयानंतर सत्यजित तांबे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “येत्या ४ तारखेला…!”

कोळगावातील यशवंत लक्ष्मण गोरडे यांनी नवरी मुलगी एमएच २० सीए३९२९ या क्रमांकाच्या पल्सर मोटरसायकलवर एका अनोळखी पुरुष व एका महिलेसोबत जातांना पाहिल्याचे सांगितल्यावर आम्ही मध्यस्थी संभाजी ब्राहमणे याचे कडे जाऊन चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची भाषा केली. तसेच जेऊर येथे मिराबाई, दिक्षा, व तीच्या बहिणीकडे गेलो असता तेथील पत्र्याच्या खोलीला कुलूप आढळल्याने संभाजी ब्राह्मणे ( रा.पिचडगाव तालुका नेवासा ) मीराबाई जाधव (रा. बायजाबाई जेऊर ता. नगर ) दीक्षा महादेव कदम व तिची बहीण ( नाव गाव माहित नाही ) यांनी खोटा बनाव करून आम्हास दोन लाख ६० हजाराला गंडा घातल्याचे लक्षात आल्याने त्यांचे विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किरण टेकाळे पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com