शेवगाव तालुक्यात एक गट, दोन गणांची भर

इच्छुकांचा उत्साह वाढला
शेवगाव तालुक्यात एक गट, दोन गणांची भर

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

राज्य निवडणुक आयुक्तांच्या अधिसुचनेनुसार तालुक्यात एक नविन जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिची गणांची भर पडणार आहे. यामुळे 5 गट व 10 गण येणार आहेत. या गट व गाणात बदल झाला असला तरी तो प्रस्थापित कोणात्याही नेत्याची गैरसोय करणारा ठरणार नाही. यामुळे नविन तीन जागेसाठी संबंधित इच्छुकांचा उत्साह वाढला आहे.

नविन रचनेनुसार जुन्या लाडजळगाव गटा ऐवजी नविन अमरापुर व मुंगी असे दोन गट करण्यात आले आहेत. अमरापुर गटात आव्हाणे, अमरापुर, फलकेवाडी, बर्‍हाणपुर, या भातकुडगाव गटातील भर पडली आहे. तर उर्वरित गावे लाडजळगाव गटातील आहेत. मुंगी गटात बोधेगाव व लाडजळगाव व इतर काही गावांचा समावेश केलेला आहे. पुर्वीचे दहिगावे ने, बोधेगाव, भातकुडगाव गट व नविन अमरापुर व मुंगी असे पाच जिल्हा परिषद गट तयार झाले आहेत.

तालुक्यात ठराविक गावांमध्ये संबंधित राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. मात्र निवडणुकीच्या दृष्टीने संबंधित नेतेमंडळींनी सर्वसामान्य जनतेशी विविध प्रकारे संपर्क सुरवात केलेली आहे. येणार्‍या निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष अधिक जागा जिंकणार की गमावणार की खातेच खोलु शकणार नाही याचा अंदाज निवडणुक प्रचार काळातच समजेल. येणार्‍या निवडणुकीचे चित्र सर्वच राजकीय पक्षांचे नेतृत्व एकसंधपणा साधत डावपेच टाकतात यावर अवलंबुन राहणार आहे. महाविकास आघाडीताल पक्ष एकत्र लढतात की स्वतंत्र यावरही निवडणुकीची गणिते अवलंबुन राहणार आहे.

राष्ट्रवादीचे आहे वर्चस्व

मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जिल्हा परिषद गट व 8 गण ताब्यात घेऊन वर्चस्व सिध्द केले होते. तर जनशक्ती मंचने लाडजळगाव गटात बाजी मारत एका जागा जिंकत विरोधकांना चपराक दिली होती. भाजपाला अंतर्गत दुफळीमुळे एकही जागा जिंकता आली नव्हती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com