शेवगाव तालुक्यात वार्‍यासह अवकाळी पावसाची हजेरी
ढगांनी दाटून आलेल्या काळ्याभोर आकाशात कडाडलेली वीज

शेवगाव तालुक्यात वार्‍यासह अवकाळी पावसाची हजेरी

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

मागील दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात आभाळ भरून येत होते. उकाडा ही जाणवत होता.

आज बुधवारी सायंकाळी 7 च्या सुमारास ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली व शेतकर्‍यांच्या संकटात भर टाकली.

वाढता करोना संसर्ग व लॉकडाऊनमध्ये या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर टाकली. मार्च महिन्यातील दि.20 रोजीच्या अवकाळी वादळ वार्‍यासह गारांच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या नुकसानीमध्ये मका, गहू, हरभरा, कांदे, बाजरी यासह पपई, पेरू, आंबा आदी फळबागांचाही समावेश होता. काढणीला आलेल्या मका, गहू, हरभरा, बाजरीचे मोठे नुकसान झाले होते.

आज झालेल्या पावसाने पहिल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यातुन वाचलेल्या शेकडो एकरावरील कांदा, पपई, टरबूज, खरबुज, आंबा या पिकांचे नुकसान केले आहे. अवकाळीच्या डबल शॉकमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com