शेवगाव तालुक्यात 35 वाहन चालकांना 87 लाखांचा दंड

बेकायदा वाळू- मुरूम वाहतूक प्रकरण
File Photo
File Photo

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव तालुक्यात सुरु असलेल्या विनापरवाना व बेकायदा वाळू व मुरूम वाहतुकीस आळा बसावा, यासाठी तहसील कार्यालयातील भरारी पथकाकडून प्रयत्नपूर्वक काम सुरु आहे. यात 15 जानेवारीअखेर अवैधपणे वाळू वाहतूक करणार्‍या 18, तसेच मुरूम वाहतूक करणार्‍या 17 अशा 35 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येवून 86 लाख 71 हजार रुपये दंडाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान, यापैकी 15 वाहनधारकांकडून 34 हजार 78 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार छगन वाघ, प्रशिक्षणार्थी निवासी नायब तहसीलदार राहुल गुरव, नायब तहसीलदार मयूर बेरड, महसूल सहाय्यक नितीन बनसोडे यांनी दिली. महसूल विभागामार्फत या आधीचे उपविभागीय महसूल अधिकारी देवदत्त केकान तसेच नव्याने हजर झालेले उपविभागीय अधिकारी महादेवराव श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सातत्याने सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले.

तालुक्यात सुरु असलेल्या बेकायदा व विना परवाना वाळू व मुरूम वाहतुकीबाबत वृत्त पत्रातून आवाज उठविताच तालुका महसूल प्रशासन खडबडून जागे झाले असून महसूल विभागाकडून सुरु असलेल्या कारवाई बाबत पर्यावरण प्रेमी नागरीकातून समाधानाचा सूर व्यक्त होत असून महसूल विभागाने कारवाईच्या सुरु केलेल्या या सत्रात सातत्य राखण्याची मागणीही पर्यावरण प्रेमी नागरीकांतून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com