शेवगाव तालुक्यातील नदीकिनारील गावांना सतर्कतेचा इशारा

मुंगी येथे आपत्कालीन उपयोजनांची बैठक
शेवगाव तालुक्यातील नदीकिनारील गावांना सतर्कतेचा इशारा

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. आज सकाळी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून प्रशासनाच्या वतीने गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंगी येथे आपत्कालीन उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार छगन वाघ, यांनी मुंगी येथे भेट देवून उपाय योजनाबाबत तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, यांना महत्वपूर्ण सूचना दिल्या.

धरणातील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून परिसरात वित्त हानी व जीवित हानी होणार नाही. या बाबत संबधितांनी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जायकवाडी धरणातील एकूण पाणी साठा 96.5958. टीएमसी 94 टक्के तसेच उपयुक्त पाणी साठा 70.5295 टीएमसी 92 टक्क्यावर गेल्याने गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले आह. नदी काठच्या कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. तसेच ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गावातील मुंगी ते नवीन खामपिंपरी, जुनी खामपिंपरी, प्रभूवाडगाव ते चापडगाव हा आपत्लाकीन गावातून बाहेर जाणारा एकमेव 7 कि.मी. अंतराचा रस्ता अनेक ठिकाणी फुटला असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या असता प्रांताधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अंकुश पालवे यांना या रस्त्यावर तातडीने मुरूम टाकून खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या. गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहण्याच्या सूचना गावात दवंडी देवून करण्यात आल्या. यावेळी सरपंच बबन भुसारी, कामगार तलाठी किशोर पवार, ग्रामसेवक सुनील राठोड, मुंगी उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी बांगर, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com