राष्ट्रवादीला खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीला खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील भातकुडगाव (Bhatkudgav) जिल्हा परिषद गटाचे (Zilla Parishad Group) राष्ट्रवादीचे सदस्य रामजी साळवे (NCP member Ramji Salve) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश (Shivsena Entry) केला. यामुळे शेवगाव तालुक्यात (Shevgav Taluka) राष्ट्रवादीला (NCP) खिंडार पडले असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील (Zilla Parishad President Rajshritai Ghule Patil) यांच्या तालुक्यात राष्ट्रवादीचे सदस्य (NCP Member) असणारे साळवे यांनी शिवधनुष्य हाती घेतले आहे.

मुंबई (Mumbai) येथील शिवसेनाभवन येथे शिवसेना उपनेते तथा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर (Shivsena Deputy Leader and Coordinator Vishwanath Nerurkar), नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, शेवगाव तालुका प्रमुख अ‍ॅड.अविनाश मगरे, उपप्रमुख विठ्ठल घुले, लक्ष्मण ताचतोडे, मधुकर कराड, दहीगावने गटप्रमुख देविदास चव्हाण, अशोक कांबळे, युवा सेनेचे सादिक शेख, मिलिंद कांबळे, चंद्रशेखर ढवळे, आदींच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य साळवे यांच्यासह तालुक्यातील दादेगाव, नागलवाडी, मुंगी, वाडगाव तसेच शेवगाव शहरातील काही कार्यकर्त्यांनीशिवसेनेत जाहीर प्रवेश केला. विधान परिषद, जिल्हा परिषद, व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पाश्वभूमीवर झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडले गेले आहे.

Related Stories

No stories found.