शेवगाव तालुक्यात लम्पी स्कीन लसीच्या 7 हजार डोसची मागणी

जनावरांच्या लसीकरण मोहिमेला वेग
शेवगाव तालुक्यात लम्पी स्कीन लसीच्या 7 हजार डोसची मागणी

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

जनावरांच्या लम्पी स्कीन रोगाचा शेवगाव तालुक्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली असून त्यासाठी लसीच्या 7 हजार डोसची मागणी करण्यात आली आहे. या यापैकी 2 हजार 500 लसीचे डोस उपलब्ध झाले असून भातकुडगाव, भायगाव, बक्तरपूर व जोहरापूर येथे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

तालुक्यातील भातकुडगाव येथील शेतकर्‍याच्या एका गाईमध्ये लंपीची लक्षणे आढळून आल्याने पशुवैद्यकीय विभागाने भातकुडगाव परिसरातील भातकुडगावसह, भायगाव, खामगाव, बक्तरपूर, हिंगणगाव, जोहरापूर, आखतवाडे, आपेगाव, लोळेगाव, ढोरजळगाव व ढोरजळगाव ने आदी परिसरातील गावागावांत तेथील ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून जंतूनाशकांची फवारणी करण्यात आली आहे.

दरम्यान गुरुवारी शेवगाव पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या तालुक्यातील सर्वच्या सर्व 14 पशुवैद्यकीय केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व खाजगी पशुवैद्यकांच्या बैठकीत लंपीच्या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजने बाबत तसेच लंपीची लक्षणे दिसून येणार्‍या जनावरांबाबत तातडीने वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून त्यानंतरच पुढील कार्यवाही करणे आवश्यक असल्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या.

आठवडे बाजार बंद

जिल्हाधिकारी व जिल्हा पशु संवर्धन अधिकारी यांच्या सुचनेनुसार तालुक्यातील बोधेगाव व शेवगाव येथे भरणारा जनावरांचा आठवडे बाजार, लंपी आजाराची साथ आटोक्यात येईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आजचा गुरुवारचा बोधेगाव येथील जनावरांचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला. तर रविवारचा शेवगाव येथील जनावारांचा आठवडे बाजार देखील बंद राहणार असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चारुदत्त असलकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com