शेवगाव तालुक्यात 77 हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

14 हजार 832 क्विंटल खत मागणीची नोंद
शेवगाव तालुक्यात 77 हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव तालुक्यात खरिपाची 79 गावे असून खरीप क्षेत्र 56 हजार 272 हेक्टर आहे. परंतु यंदाच्या खरीप हंगामासाठी तालुक्यात 77 हजार 675 हेक्टर क्षेत्रात खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. तर तालुक्यासाठी 14 हजार 832 मे टन विविध खतांची मागणी नोंदविण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी दिली

तालुक्यात मागील पावसाळ्यात 865 मीमी वार्षिक सरासरी पर्जन्यमानाच्या 159 टक्के पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम उच्चांकीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तालुक्यासाठी 16 हजार 947 क्विंटल बियाणांचे आवंटन नोंदविण्यात आले आहे. त्यात बाजरी 182 क्विंटल, कापूस 13 हजार 820 क्विंटल, मका 80, तूर 1 हजार 218, मूग 144, उडीद 262, भुईमूग 425 क्विंटल बियाणांचा समावेश आहे

तालुक्यासाठी 14 हजार 832 मे टन विविध खताची मागणी नोंदविण्यात आली आहे. युरिया 5 हजार 225, डी ए पी 1 हजार 669, एम ओ पी 572, एस एस पी 2 हजार 461, मिश्र खते 4 हजार 905 मे टन आदी विविध रासायनिक खतांचा समावेश आहे.

तालुक्यात 48 शेती गट तसेच महिलांचे 9 शेती गट कार्यरत असून यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना त्यांच्या बांधावर बियाणे व खते उपलब्ध करून देण्याचा तालुका कृषी विभागाचा प्रयत्न असून शेतकर्‍यांनी याबाबत आपली मागणी तालुका कृषी कार्यालयाकडे नोंदविण्याचे आवाहन टकले यांनी केले आहे.

पीकनिहाय खरीप नियोजन हेक्टरमध्ये

कापूस 31 हजार, बाजरी 4 हजार 560, तूर 14 हजार 500, मका 0. 300, मूग 1 हजार 600, उडीद 1 हजार 750, भुईमूग 0. 850, सोयाबीन 1 हजार 550, तीळ 0. 60, कारले 0.5, ऊस 18 हजार हेक्टर आशा प्रमुख पिकांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.