शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींचे वाजणार बिगुल

निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या कार्यक्रम जाहिर
शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींचे वाजणार बिगुल

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे निवडणुकीसाठी सर्व गावांमधून जोरदार जयारी सुरू झाली आहे.

यात राजकीयदृष्ट्या महत्वाच्या व मोठ्या लोकसंखेच्या गावातील ग्रामपंचायतीचा समावेश असल्याने त्या गावातील राजकीय वातावरण दिवाळीनंतर ढवळून निघणार आहे. शेवगाव तालुक्यातील दहीगाव-ने, जोहरापूर, खामगाव, भायगाव, प्रभूवाडगाव, खानापूर, रांजणी, वाघोली, आखेगाव तीर्तफा, अमरापूर, सुलतानपूर खुर्द व रावतळे कुरुडगाव आदी गावच्या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 मे 2022 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

13 ऑक्टोबर रोजी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 13 ते 18 ऑक्टोंबर या कालावधीत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. तर 21 ऑक्टोंबर रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक आता पुन्हा एकवार थेट जनतेतून होणार असल्याने तालुक्यातील वरील 12 गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीस मोठे महत्व तयार झाले असून या निवडणुका अटीतटीच्या व चुरशीच्या पद्धतीने रंगणार असल्याने वरील 12 गावासह तालुक्यांचेही लक्ष या गावातील ग्रामपंचायत निवडणूकीकडे लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com