10 उपसरपंचांच्या निवडी बिनविरोध

शेवगाव तालुक्यात 6 ठिकाणी महिलांची बाजी
10 उपसरपंचांच्या निवडी बिनविरोध

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यात निवडणुका झालेल्या 12 ग्रामपंचायती मध्ये आज उपसरपंच पदाच्या निवडी झाल्या. यावेळी बारा ग्रामपंचायत पैकी 10 ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झालीअसून फक्त दोन ठिकाणी उपसरपंच पदासाठी उमेदवाराला निवडणुकीला सामोरे जावे लागले.

यावेळी जनतेतून पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत 12 पैकी दहा ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच निवडून आल्या तर आज पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत 12 पैकी 6 ग्रामपंचायत मध्ये महिला उपसरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.

निवडणुक झालेल्या अमरापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी गणेश बोरुडे हे विजयी झाले. त्यांना सहा मते मिळाली तर विरोधी उमेदवार समीर रफिक शेख यांना चार मते मिळाली. एक मत बाद झाले. सरपंच पदासाठी जनतेतून निवडून आलेल्या आशाताई गरड या ग्रामपंचायत सदस्य म्हणून देखील विजयी झाल्या आहेत.

त्यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. आखेगाव ग्रामपंचायत मध्ये अशोक बन्सी गोरडे हे उपसरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांना सहा मते मिळाली विरोधी उमेदवार घन:शाम विठ्ठल पायघन यांना तीन मते मिळाली तर तीन सदस्य गैरहजर राहिले.

बिनविरोध उपसरपंच असे -

खामगाव : सुभाष यादव बडधे, रावतळेकर कुरुडगाव : वर्षा नितीन भराट, रांजणी : अंजना संभाजी वाल्लेकर, जोहरापूर : आशा बाबासाहेब उगलमुगले, दहिगावने : राजाभाऊ पाऊलबुद्धे. खानापूर : तात्यासाहेब बाप्पासाहेब थोरात, भायगाव : आशाबाई लांडे, सुलतानपूर खुर्द : मच्छिंद्र एकनाथ डोईफोड, वाघोली : कांताबाई बबन बोरुडे. प्रभू वडगाव : मुक्ताबाई कचरू बटुळे आदी.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com