तहसिलदारांना दिली जळालेल्या पिकांची भेट

शेवगावात हर्षदा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांचा मोर्चा
तहसिलदारांना दिली जळालेल्या पिकांची भेट

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. पावसाअभावी पिके जळू लागली असल्याने शासनाने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे वर्ग करावेत या मागणीसाठी जनशक्तीच्या नेत्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना पावसाअभावी जळून चाललेली बाजरी, कपाशी, मूग, सोयाबीन पिकांची भेट देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले.

मंगळवारी (दि.5) रोजी जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डीच्यावतीने तहसील कार्यालय शेवगाव यांचे समोर शेतकर्‍यांनी आज जळालेली पिके तहसीलदार प्रशांत सांगडे यांना सस्नेह भेट देऊन अनोख्याप्रकारचे आंदोलन केले. यावेळी अ‍ॅड.शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, कॉ.राम पोटफोडे, राजू पातकळ, अशोक पातकळ, गणेश धावणे, भाऊसाहेब फटांगरे, माणिक गर्जे, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, गणपत फलके, शेषराव फलके, देविदास गिर्हे, पांडुरंग गरड, रवींद्र कणके, बाळासाहेब पाटेकर, रघुनाथ सातपुते, विनोद पवार, अण्णा काळे, आबासाहेब मोरे, ज्ञानेश्वर शेटे, राधाकिसन शिंदे, सुरेश काजळे, बाळासाहेब काकडे, प्रल्हाद पुंडे, अर्जुन धोरकुले, डॉ.संतोष घनवट, आदिनाथ झिरपे, भाऊसाहेब बर्डे, भाऊसाहेब पोटभरे, आसाराम शेळके, अशोक ढाकणे, अकबर शेख, सुनील दारकुंडे, रज्जाक शेख, वैभव पूरनाळे, दादा सातपुते, विष्णू दिवटे, संदेश खरात, मनोज घनवट, भारत लांडे, भाऊसाहेब राजळे, सुनील गवळी, रघुनाथ सातपुते, नवनाथ साबळे, जालिंदर कापसे, मनोज घोंगडे, शिवाजी औटी, भागचंद कुंडकर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी काकडे म्हणाल्या की, सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी लाखोंचा खर्च करून पिके घेतली. ऐन पिकांची वाढ चालू झाली व पाऊस लांबल्याने सर्व पिके जळू लागली आहेत. कधी नव्हे एवढी भीषण परिस्थिती तालुक्यात निर्माण झाल्याने हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला असल्याने शेतकर्‍यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्‍यांना अर्थसहाय्य देऊन जनावरांच्या दावणीवरच चारा द्यावा. जर शासनाने आमच्या मागणीचा विचार केला नाही तर तालुक्यात एकाच दिवशी एकाचवेळी प्रत्येक गावामध्ये सरकारी अधिकारी कर्मचार्‍यांना घेराव आंदोलन करण्यात येईल. याप्रसंगी माणिक गर्जे, विष्णू दिवटे, अशोक पातकळ, भाऊसाहेब पोटभरे आदींची भाषणे झाली.

हल्ल्याचा निषेध

या आंदोलनावेळी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करून आंदोलकांना जनशक्तीच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com