शेवगाव तालुक्यात 254 शाळा सुरू

13 हजार 318 विद्यार्थ्यांची उपस्थिती
शेवगाव तालुक्यात 254 शाळा सुरू
File Photo

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक 227 तर 33 खाजगी प्राथमीक शाळा असून यापैकी सध्या 226 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक तर 28 खाजगी अशा एकूण 254 शाळा सुरू झाल्या असून 18 हजार 232 पट संख्येपैकी आज सोमवारी 13 हजार 618 विद्यार्थ्यांची सुमारे 62 टक्के उपस्थिती असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी दिली.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीडवर्षांपासून बंद असलेल्या तालुक्यातील इयत्ता पहिली ते चौथीच्या माध्यमिक शाळा आज सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील कुरुडगाव जि.प प्राथमीक शाळा गावात करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्या सुचनेनुसार 22 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे पत्र शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक संजय भुजंगराव ढोले यांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पाठविले आहे.

दरम्यान दिवाळीच्या सुट्टीनंतर तालुक्यातील 62 माध्यमिक शाळा आज सोमवार पासून पूर्ववत सुरू झाल्या असून यापैकी काही शाळांत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग असून 31 हजार 718 पट संख्येपैकी आज सोमवारी किती विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. याबाबतची माहिती संध्याकाळी उशिरापर्यंत संकलित करण्याचे काम सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची निश्चित माहिती उपलब्ध झाली नाही. तालुक्यातील प्राथमिक शाळा दिवाळीच्या सुट्टीनंतर दि.11 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या असल्या तरी उपस्थितीमध्ये हळूहळू वाढ होणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com