शेवगाव तालुक्यात सात दिवसांचा जनता कर्फ्यू

शेवगाव तालुक्यात सात दिवसांचा जनता कर्फ्यू
File Photo

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शहरासह तालुक्यात वाढणार्‍या करोना बाधितांच्या संख्येमुळेे तालुक्यात 11 ते 17 मे या कालावधीत सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात आरोग्यसेवा, पेट्रोल पंप, दूध संकलन सुरू राहणार असून किराणासह इतर व्यवसाय बंद असणार आहेत. या जनता कर्फ्यू बाबत तहसीलदार अर्चना पागिरे यांनी आदेश काढले असून नागरिकांनी नियमाचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

शेवगाव शहर व तालुक्यात अनेक दिवसांपासून करोना बाधितांची संख्या वाढताच आहे. ग्रामीण भागातील अनेक गावे हॉटस्पॉट बनली आहेत. करोना संसर्ग रोखण्यासाठी साखळी तोडणे गरजेचे आहे. याबाबत तहसीलदार पागिरे यांनी प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकारी, व्यावसायिक व लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्याबाबत निर्णय घेतला आहे.

11 ते 17 मे या कालावधीत सात दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या कालावधीत रुग्णालये, औषधांची दुकाने सुरू राहतील मात्र इतर वस्तुंची विक्री करता येणार नाही. पेट्रोल व डिझेल पंप (फक्त अत्यावश्यक सेवेसाठी), दूध संकलन सकाळी 7 ते 9 या कालावधीत सुरू राहील. तर अत्यावश्यक असलेली किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विकेते व इतर सर्व प्रकारची दुकाने पूर्णपणे बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे. या काळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून करोना साखळी तोडण्यासाठी मदत करावी, कोणीही नियम माडू नेय, नियम मोडणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार पागिरे यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com