शेवगावच्या कुंटणखाण्यावर नगर पोलिसांचा छापा

दोन मुलींची सुटका, दोघांना अटक
शेवगावच्या कुंटणखाण्यावर नगर पोलिसांचा छापा

अहमदनगर|Ahmedagar

शेवगाव (Shevgav) येथील नेवासा रोडवर (Newasa Road) हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर (Prostitution) नगर पोलीस (Nagar Police) व पुणे येथील फ्रिडम फर्म (Pune Freedom Firm) या सेवाभावी संस्थेने संयुक्त कारवाई करत छापा (Raid) टाकला. या कारवाईत दोघांना अटक (Arrested) करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. तर दोन मुलींची सुटका केली आहे. शनिवारी रात्री हॉटेल सागर (Hotel Sagar) येथे ही कारवाई केली. सचिन रूपचंद मुसावत (रा. शेवगाव), संदीप माणिक शेळके (रा. रामनगर, शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. फ्रिडम फर्मचे (Pune Freedom Firm) संदेश जोगेराव (रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

शेवगावमधील (Shevgav) नेवासा रोडवर (Newasa Road) सागर हॉटेलवर (Hotel Sagar) लहान मुली व महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती फ्रिडम फर्म या सेवाभावी संस्थेला (Freedom Firm to Charitable Organization) मिळाली होती. त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांची भेट घेऊन सदरची कारवाई करण्याबाबत सांगितले. अधीक्षक पाटील (SP Manoj Patil) यांनी याबाबत पोलीस उपअधीक्षक (गृह) बाजीराव पोवार (Deputy Superintendent of Police (Home) Bajirao Powar) यांना सूचना केल्या. पोलीस निरीक्षक रणजित डेरे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे सहायक निरीक्षक सतिष गावीत, पोलीस हवालदार कांबळे व इतर कर्मचार्‍यांचे एक पथक स्थापन करून फ्रिडम फर्मच्या सदस्यांबरोबर कारवाईसाठी रवाना केले.

शेवगावचे उपअधीक्षक सुदर्शन मुंढे (Shevgaon Deputy Superintendent Sudarshan Mundhe) यांना याबाबत कल्पना देण्यात आली. उपअधीक्षक मुंढे कर्मचार्‍यांसह नगर पथकासोबत हजर झाले. पथकाने एक बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठविला. त्या ग्राहकाने इशारा दिल्यानंतर पथकाने हॉटेलमध्ये छापा (Hotel raid) टाकून दोन मुलींची सुटका केली. पुढील तपास शेवगाव पोलीस (Shevgav Police) करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com