शेवगाव पोलीसांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई

दिड लाखांचा मुद्देमाल जप्त || अवैध धंदेवाल्यांचे दणाणले धाबे
शेवगाव पोलीसांची अवैध धंद्यांवर धडक कारवाई

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव पोलीसांनी अवैध धंदयावर छापे टाकत धडक कारवाई सुरू केल्याने अवैध धंद्यावाल्याचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये दिड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विलास पुजारी यांनी वेगवेगळे तिन पथके बनवुन शेवगाव तालुक्यातील विविध ठिकाणी बुधवारी छापे टाकले आहेत.या छाप्यांमध्ये शेवगाव तालुक्यातील रांजणी गावातील अनुसया विश्वास पवार यांच्या घरावर छापा टकून 60 लिटर तयार हातभट्टी दारु व 575 लिटर हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायण असे 50 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच भाविनिमगाव गावातील अर्जुन व्यंकु शिंदे यांच्यावर छापा टाकुन 80 लिटर तयार हातभट्टी दारु व 500 लिटर हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायण असे 50 हजाराचे साहित्य जप्त केले आहे.

सोनेसांगवी गावातील भागिरनाथ मारुती पवार यांचेवर छापा टाकुन त्याचेकडुन 10 लिटर गावठी हातभट्टी तयार दारु जप्त करण्यात आली आहे. खामपिंप्री गावातील बाळासाहेब रावसाहेब जगधने याचेवर छापा टाकुन त्यांचेकडुन 6 देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. बोधेगाव गावातील आकाश कैलास चव्हाण यांचेवर छापा टाकुन त्याचेकडुन मटक्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच शेवगाव शहरातील प्रविण अरुण भारस्कर याच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकुन त्याचेकडुन मटक्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. सामनगाव गावातील हनुमंत अंकुश झाडे याचेकडुन देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विलास पुजारी, सहाय्यक पोलीस निरिक्षक आशिष शेळके, सहाय्यक पोलीस निरिक्षक विश्वास पावरा, कर्मचारी परशुराम नाकाडे, नानासेहब गर्जे, पाडुरंग विर, अभयसिंग लबडे, रविंद्र शेळके, उमेश गायकवाड, किरण टेकाळे, सुखदेव धोत्रे, शहाजी आधळे, संतोष धोत्रे, सचिन हाडके, सचिन खेडकर, संपत खेडकर, संभाजी धायतडक, कल्पना गावडे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com