शेवगाव, पाथर्डी शहरांसह 54 गावांची पाण्यासाठी वणवण

15 दिवसांपासून पाणीपुरवठा योजना बंद
शेवगाव, पाथर्डी शहरांसह 54 गावांची पाण्यासाठी वणवण

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका (Heavy Rain) शेवगाव - पाथर्डी (Shevgav-Pathardi) शहरांसह 54 गावांना पाणी पुरवठा (Water supply) करणार्‍या योजनेला बसला आहे. शेवगाव शहरातील (Shevgav City) काही प्रभागात पाणी पुरवठा (Water supply) तब्बल 15 दिवसापासुन बंद आहे. ऐन पावसाळ्यात शहरात पाण्यासाठी उन्हाळ्या सारखी परिस्थिती झाली आहे.

शेवगाव (Shevgav) शहरातील विविध भागात 8 दिवसांतुन एकदा पाणी येते. सध्या पाऊस, पुर (Flood), वीजपुरवठा खंडीत (Power outage), पाण्यात गाळ आला आदी कारणांमुळे 15 दिवसांपासुन पाणी पुरवठा बंद पडला आहे. मात्र यावर मात करण्यास यंत्रणेला अद्याप यश आले नाही. सध्या शेवगावकरांना पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे. पाऊस असल्यामुळे अनेकांनी गच्चीवरील पाणी (water) साठवले. काहींनी बोरवेल (Borewell), विहिरीचा (Well) आधार घेतला. पाण्याचे टँकर व बॉक्स यांना मागणी वाढल्याने भावही वाढले. मात्र पर्याय नसल्याने पाणी विकत घ्यावेच लागले. पंधरा दिवसानंतर काही प्रभागात पाणी आले मात्र ते जलशुध्दीकरण योजनेतुनच गढूळ आले.

येथील पाणी पुरवठा योजना जुनाट झालेल्या आहेत. यामुळे वारंवार बिघाड होत आहे. या योजनेवर तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी लाखों रुपये खर्च झालेले आहेत. मात्र यामुळे पुर्णपणे पाणी प्रश्न सुटलेला नाही. तालुक्यातील पुरग्रस्त भागातही पिण्याचे पाणी व वीजेचा गंभीर प्रश्न आहे. याकडे शासकीय यंत्रणेने गांभीर्याने पाहुन ते सुरळीत करण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com