मदतीपासून कोणीही वंचीत राहू नये

अतिवृष्टी आढावा बैठकीत आ. राजळे यांच्या अधिकार्‍यांना सूचना
मदतीपासून कोणीही वंचीत राहू नये

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी-शेवगाव (Pathardi-Shevgav) तालुक्यातील अनेक गावांत अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतीपिके (Crops), पशुधन (Livestock), विजेचे खांब (Electricity Pole), रोहीत्र (Rohitra), रस्ते (Road), पूल, बंधारे (Bridge, dams) यांच्यासह जलसंधारणाच्या (Water conservation) कामाचे मोठे नुकसान (Loss) झाले आहे. ज्याठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे तेथे टँकरने पाणीपुरवठा (Water supply by tanker) सुरू करा. गावठाणचा वीजपुरवठा तातडीने सुरू करा. प्रत्येक विभागाच्या खातेप्रमुखांनी जे नुकसान झाले. त्याची सविस्तर माहिती घेऊन निधीसाठी वरिष्ठ कार्यालयांकडे अहवाल पाठवा. तसेच पंचनामे करताना मदतीपासून कुणीही वंचीत राहणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन आमदार मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांनी केले.

पाथर्डी तहसील कार्यालयाच्या (Pathardi Tahsil Office) सभागृहात शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीचा आढावा (Shevgav-Pathardi Heavy rain Review) घेण्यासाठी आमदार मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकार्‍यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी आ.राजळे (MLA Monika Rajale) बोलत होत्या. प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड, सभापती गोकुळ दौंड, जि.प.सदस्य राहुल राजळे, गटविकास अधिकारी शितल खिंडे, तालुका कृषी अधिकारी, शेवगावचे गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, माणिक खेडकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, बाळासाहेब अकोलकर, सुनील ओव्हळ, रविंद्र वायकर, सुभाष केकाण, सुनील परदेशी, एकनाथ आटकर,अनिल बोरुडे,बजरंग घोडके,रमेश गोरे, नारायण पालवे,दादापाटील कंठाळी, नारायण काकडे, अर्चना शेळके, प्रविण खेडकर, संदीप पठाडे, गणेश चितळकर उपस्थित होते. यावेळी महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीयमहामार्ग, वीजवितरण, पाणी पुरवठा, नगरपालिका, वनविभाग, पशुधन विकास अधिकारी या विभागासह सर्वच विभागाच्या खातेप्रमुखांनी नुकसानीची आकडेवारी सांगून पंचनामे सुरू असल्याचे सांगितले.

अधिकार्‍यांना खडे बोल

वीजवितरण कंपनीच्या कोरडगाव मंडळाच्या महिला अधिकार्‍याविरोधात अनेक गावांतील सरपंच व ग्रामस्थांच्या सतत तक्रारी आहेत. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून आ.राजळे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता दिलीप तारडे यांनाही खडे बोल सुनावले. शेवगाव,पाथर्डी दोन्ही शहरांत बारा दिवसांपासून पाणी नाही तर अद्याप टँकर का सुरू केले नाहीत. यावरून दोन्ही मुख्याधिकार्‍यांनाही झापले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com