शेवगाव |वार्ताहर| Shevgav

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा मंगळवारी (दि. 1) शेवगाव येथे पार पडला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले, शेवगाव नगरपरिषदेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असून त्यासाठी पक्षाध्यक्ष राजू शेट्टीही शेवगावमध्ये येणार असून पूर्ण ताकतीने स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीमध्ये उतरणार आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास कोरडे, पक्ष जिल्हाध्यक्ष राऊसाहेब लवांडे, जिल्हाध्यक्ष दक्षिण विभाग सुनील लोंढे, उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, जिल्हा कार्याध्यक्ष दादा पाचरणे, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे, बाईजाबाई बटूळे, रमेश कचरे, पक्ष तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड, संघटना तालुकाध्यक्ष प्रवीण म्हस्के, मेजर अशोक भोसले, अमोल देवढे, दत्ता फुंदे, शहराध्यक्ष भाऊ बैरागी, संदीप मोटकर, रावसाहेब मगर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे म्हणाले, साखर कारखान्यांनी दर कमी दिला तर खपवून घेतले जाणार नाही. येत्या भविष्यकाळात मोठे आंदोलन साखर कारखान्यांवर उभे करू, असे त्यांनी संगितले.

यावेळी दीपक ढाकणे, भैया राऊत, सरोज इनामदार, निलेश गटकळ, मच्छिंद्र गोरडे, दीपक झिरपे, अंबादास भागवत, रमाकांत काळे, शुभम काळे, प्रतिभा तांबे, सचिन भोसले, तुषार शिंदे आदींनी पक्षामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत भराट यांनी केले तर आभार रावसाहेब लवांडे यांनी मानले.