शेवगाव नगरपालिका प्रभाग रचना कार्यक्रम पुन्हा जाहिर

14 मे पर्यंत हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत
शेवगाव नगरपालिका प्रभाग रचना कार्यक्रम पुन्हा जाहिर

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून निवडणूक आयोगाने शेवगाव नगर पालिकेच्या निवडणूक पूर्व प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम पुन्हा जाहीर केला आहे. 10 मार्च रोजी सुरु असलेल्या टप्प्यापासून निवडणुकीची कार्यवाही त्वरित सुरु करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

10 ते 14 मे या कालावधीत हरकती व सूचना दाखल करावयाच्या असून 23 मे रोजी प्राप्त हरकती व सुनावणी त्यानंतर 30 मे रोजी हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देवुन संबधित विभागीय आयुक्त यांना अहवाल पाठविला जाणार आहे. 6 जून रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता, यानंतर नगर परिषदेच्या संकेत स्थळावर 7 जून रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शेवगाव नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील प्रभाग रचनेचे प्रारूप मार्च महिन्यात प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याबाबत 17 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती व सूचना नगरपरिषद कार्यालयाकडे सादर करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र 10 मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे या सुरु असलेल्या टप्प्यापासून निवडणुकीची कार्यवाही त्वरित सुरु करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार आता पुन्हा नव्याने निवडणूक पूर्व कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

तीन सदस्यांची वाढ

शेवगाव नगर परिषदेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत निवडून द्यावयाच्या प्रभागाची तसेच सदस्यांची संख्या 21 होती मात्र आता दोन सद्सीय प्रभाग रचनेनुसार प्रभागाची संख्या 12 तर निवडून द्यावयाची नगर परिषद सदस्यांची संख्या 24 झाल्याने आता नव्याने तीन नगर सेवकांची संख्या वाढणार असल्याने इच्चुकांच्या हालचाली गतिमान झाल्याचे दिसत आहे.

Related Stories

No stories found.