शेवगाव नगरपरिषदेसाठी मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध

32 हजार 296 मतदारांची संख्या
शेवगाव नगरपरिषदेसाठी मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदारांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली असून नगरपरिषदेच्या एकूण 12 प्रभागांत 16 हजार 496 पुरुष व 15 हजार 800 महिला असे एकूण 32 हजार 296 मतदार असणार आहेत.

शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये सर्वाधिक 3 हजार 438 मतदारांचा तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वात कमी 2 हजार 016 मतदारांचा समावेश असल्याची माहिती नगरपरिषदेच्या कार्यालयातून देण्यात आली. शेवगाव नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना व प्रभाग निहाय आरक्षण या आधीच जाहीर करण्यात आले असून आता मतदारांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रारूप यादीवर दि. 21 जूनपासून दि.27 जूनपर्यंत हरकती दाखल करण्यात येणार असून त्यानंतर दि.5 जुलै रोजी प्रभागनिहाय मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी दिली.

प्रारूप यादीनुसार प्रभाग मतदार असे

प्रभाग क्रमांक 1- मतदारांची संख्या 2214, प्रभाग क्रमांक 2 - मतदारांची संख्या 2016, प्रभाग क्रमांक 3 - मतदारांची संख्या 2744, प्रभाग क्रमांक 4-मतदारांची संख्या 3227, प्रभाग क्रमांक 5- मतदारांची संख्या 2466, प्रभाग क्रमांक 6- मतदारांची संख्या 2487, प्रभाग क्रमांक 7 - मतदारांची संख्या 2543, प्रभाग क्रमांक 8- मतदारांची संख्या 3438, प्रभाग क्रमांक 9- मतदारांची संख्या 2232, प्रभाग क्रमांक 10- मतदारांची संख्या 2348, प्रभाग क्रमांक 11-मतदारांची संख्या 3326, प्रभाग क्रमांक 12- मतदारांची संख्या 3255,

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com