शेवगाव : चार वर्षाच्या मुलीसह विवाहीतेची आत्महत्या

शेवगाव : चार वर्षाच्या मुलीसह विवाहीतेची आत्महत्या

शेवगाव |तालुका प्रतिनिधी | Shevgav

घरगुती छोट्या वादातून चार वर्षाच्या मुलीसह विवाहितेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना कोळगाव ता. शेवगाव येथे

रविवार दि.30 रोजी रात्रीच्या सुमारास घडली. उषा गणेश झिरपे (वय-25) असे या विवाहितेचे तर गायत्री गणेश झिरपे (वय-4) असे त्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कोळगाव येथील विवाहीता उषा झिरपे काल रविवार ता.30 रोजी किरकोळ घरगुती वादातून रात्रीच्या सुमारास आपल्या चार वर्षीय लहान मुलगी गायत्रीला घेवून घरातून निघून गेली. रात्रीच्या वेळी घरच्यांनी शोधाशोध केली असता ती कुठेही आढळून आली नाही.

आज सोमवार दि.31 रोजी सकाळी 8 च्या सुमारास त्यांच्या स्वत:च्या शेतातील विहीरीच्या काठावर दोघींच्याही चप्पला आढळून आल्या. त्यानंतर विहीरीमध्ये दोघींचेही मृतदेह आढळून आले.

याबाबत नागरीकांनी पोलीसांना खबर दिली. त्यानंतर पोलीस, नातेवाईक व ग्रामस्थांनी दोघींचेही मृतदेह विहीरीतुन बाहेर काढले. पोलीसांनी पंचनामा करुन दोघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. सायंकाळच्या सुमारास दोघींवर कोळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत महिलेस एक सहा वर्षीय मुलगा असून पती, सासू, सासरे असा परीवार आहे. या प्रकरणी जगन्नाथ अण्णासाहेब झिरपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी गायत्रीच्या आईवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com