शेवगाव बाजार समितीसाठी 26 अर्ज दाखल

220 अर्जांची विक्री, पक्षांची जुळवाजुळव
शेवगाव बाजार समितीसाठी 26 अर्ज दाखल

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या आज तिसर्‍या दिवशी 26 अर्ज दाखल झाले असून त्यात सोसायटी मतदार संघातून सर्वाधिक 20, ग्रामपंचायत व व्यापारी मतदार संघातून प्रत्येकी तीन उमेदवारी अर्जांचा समावेश असल्याची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयातून सांगण्यात आली.

बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि.27) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सोमवारी व मंगळवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. दोन्ही दिवस निरंक राहिले. बुधवारी 26 अर्ज दाखल झाले. आज अखेर 220 उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक विजयसिंग लकवार यांनी सांगितले.

बुधवारी सोसायटी सहकारी संस्था मतदार संघातील सर्व साधारण प्रवर्गातून बाजार समितीचे माजी सभापती अ‍ॅड.अनिलराव मडके, हनुमान पातकळ, मारुतराव थोरात, विजय पोटफोडे, राजेंद्र ढमढेरे, जगन्नाथ मडके, भरत वांढेकर, वसंतराव औटी, भीमराज बेडके, श्रीकिसन जुंबड, प्रसाद पवार, अनिल घोरतळे, गणेश खंबरे, ग्रामपंचायत मतदार संघातून फिरोज पठाण, शरद सोनवणे, राजेंद्र दौंड, सहकारी संस्था मतदार संघातील इतर मागास प्रवर्गातून भास्कर आव्हाड, शेतकरी संजय नांगरे, महिला राखीव प्रवर्गातून चंद्रकला कातकडे, लंका वांढेकर, व्यापारी आडते मतदार संघातून विठ्ठलराव थोरात, अमोल फडके, जाकीर कुरेशी यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

असे आले अर्ज

सोसायटी मतदार संघाच्या सर्वसाधारण विभागातून 13, महिला व इतर मागास विभागातून प्रत्येकी 2, तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती विभागातून 3, तसेच ग्रामपंचायत सर्वसाधारण विभागातून तसेच व्यापारी मतदार संघातून प्रत्येकी 3 असे एकूण 26 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com