
शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
शेवगाव-आखेगाव रोडलगत (Shevgav-Akhegav Road) हॉटेलच्या बाजूला एका खोलीत सुरु असलेल्या जुगार अड्यावर (Gambling Den) शेवगाव पोलिस पथकाने केलेल्या धडक कारवाईत (Shevgav Police Arrested) 8 जुगार्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व तीरट जुगाराचे (Gambling) साहित्य मोबाईल, मोटरसायकलसह दोन लाख 64 हजाराचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नवनाथ विष्णू कुसळकर (रा. वडार गल्ली, शेवगाव), रघुनाथ विठोबा म्हस्के (रा. खुंटेफळ), मोहम्मद बाबा मिया शेख (रा. नाईक वाडी गल्ली), काकासाहेब जगन्नाथ सुडके (रा. मळेगाव), श्रीपाद गोविंद लष्कर (रा. कोरडे वस्ती), दादासाहेब एकनाथ जाधव (रा. खंडोबा नगर), शहामत बाबामीया शेख (रा. नाईकवाडी), घनश्याम रंगनाथ फुंदे (रा. माळेगाव तालुका शेवगाव) अशी या प्रकरणी अटक केलेल्या जुगारंची (Gambling) नावे आहेत.
उप विभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, शेवगाव पोलिस स्टेशनचे परिविक्षाधिन आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना गुप्त बातमी दारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषगाने मंगळवारी (दि.4) संध्याकाळी सातचे सुमारास शेवगाव पोलीसांनी अचानक छापा (Shevgav Police Raid) टाकला. या कारवाईत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 2 लाख 64 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सपोनी आशिष शेळके, कर्मचारी राजीव ससाने, गीतांजली पाथरकर, ईश्वर गरजे, संदीप आव्हाड, सुधाकर दराडे, बाप्पासाहेब धाकतोडे, सचिन खेडकर, सुभाष खिळे, संपत खेडेकर,एकनाथ गरकळ, नकुल फलके, संभाजी धायतडक, सुनील सरोदे, शितल गुंजाळ यांनी ही कारवाई केली.