शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

निवडीच्या दुसर्या दिवशी तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड बुधवारी (दि. 10) झाली.

प्रशासनाने या पदांच्या निवडीसाठी निश्चित केलेल्या 22 ग्रामपंचायतींपैकी सोनेसांगवी येथे गावांतर्गत कुरबुर व सदस्य अनुपस्थित राहिल्याने ही निवड जिल्हाधिकार्यांच्या पुढील आदेशानंतर होणार आहे.

आरक्षणातील तांत्रिक गुंत्यामुळे नविन दहिफळ येथे सरपंचपदाची निवड झाली नाही. मात्र तेथील उपसरपंचपदी बाबासाहेब इसारवाडे यांची निवड झाली. दहिफळसाठी निघालेल्या सोडतीत सरपंचपद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे. मात्र त्या प्रवर्गातील सदस्य नसल्याने तेथे सरपंचपदाची निवड होऊ शकली नाही. शेकटे बुद्रुक येथील एका गटाचे चार सदस्य निवडून आले होते.

मात्र तेथील सदस्या छाया गरड यांचे पती साईनाथ गरड यांनी विरोधी तीन सदस्यांना एकत्रित आणून पत्नी छाया गरड यांना सरपंचपदी निवडून आणण्याची राजकीय खेळी यशस्वी केली. बहुमत असूनही इतर तीन सदस्यांना सत्तेच्या खुर्चीपासून काही अंतर दूर राहण्याची वेळ आली. तर तेथे विरोधी ज्योती फाटे यांना उपसरपंचपदाचा मान मिळाला.

तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींसाठी दि. 15 जानेवारी रोजी मतदान झाले. सदस्य निवडून आले. मात्र सरपंच-उपसरंपच पदाच्या निवडीकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. प्रशासनाने आरक्षण सोडतीनंतर 48 पैकी 22 ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी निवडीसाठी नूतन सदस्यांची बैठक बोलावली होती. त्यानुसार तालुक्यात झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडी या प्रमाणे.

अंतरवाली खुर्द शे - सरपंच तुकाराम कसाळ, उपसरपंच रामेश्वर कसाळ. भातकुडगाव- सरपंच सरस्वती वाघमोडे, उपसरपंच विठ्ठल फटांगरे. चेडे चांदगाव- सरपंच कोमल कणसे, उपसरपंच उषा माने. दादेगाव- सरपंच कुसुम दारकुंडे, उपसरपंच शंकर दारकुंडे. ढोरजळगाव शे- सरपंच रागिणी लांडे, उपसरपंच चंद्रकला बांगर. हातगाव- सरपंच अरुण मातंग, उपसरपंच नंदा बर्गे. कांबी- सरपंच नितीश पारनेरे, उपसरपंच सुनिल राजपूत. लखमापुरी- सरपंच मनिषा गावंडे, उपसरपंच अलका थोरे. मजलेशहर- सरपंच विद्या लोढे, उपसरपंच गायत्री लोढे.

मळेगाव शे- सरपंच सुरेश घोरपडे, उपसरपंच आशा निकम. नविन दहिफळ- सरपंचपद रिक्त, उपसरपंच बाबासाहेब इसारवाडे. निंबेनांदूर- सरपंच शहादेव खोसे, उपसरपंच उत्तम वाकडे. राक्षी- सरपंच रंजना कातकडे, उपसरपंच भारत कातकडे. शेकटे बुद्रुक - सरपंच छाया गरड, उपसरपंच ज्योती फाटे. शिंगोरी- सरपंच भाग्यश्री कोपळघर, उपसरपंच रामराव चेमटे. सोनविहीर- सरपंच इंदुबाई काकडे, उपसरपंच ज्ञानदेव विखे. ताजनापूर - सरपंच वैशाली गायकवाड, उपसरपंच नारायण बलिया. तळणी- सरपंच चंद्रकला सातपुते, उपसरपंच सुनिता तुपविहीरे. ठाकुर निमगाव- सरपंच सुनीता कातकडे, उपसरपंच नवनाथ बळीद. ठाकर पिंपळगाव- सरपंच संजय खेडकर, उपसरपंच रोहिणी गोयकर वरखेड- सरपंच उषा तेलोरे, उपसरपंच विकास शिरसाठ.