
शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
तालुक्यात पार पडणार्या 12 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी 38 तर 38 प्रभागांतील ग्रामपंचायत सदस्यांच्या 108 जागांसाठी 296 असे एकूण 334 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर आज हे चित्र स्पष्ट झाले. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या तालुक्यातील दहीगावने येथे 7 तर सुलतानपूर येथे 1 अशा एकूण 8 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तालुक्यात पार पडणार्या 12 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आल्याचे चित्र दिसून आले. यंदाच्या निवडणुकीत सरपंच पदाची निवड ही थेट जनतेतून असल्याने या सार्वत्रिक निवडणुकीस मोठे महत्त्व प्राप्त झाले होते.
तालुक्यात अमरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वाधिक 7 तर तालुक्यातील खामगाव, जोहरापूर, सुलतानपूर, वाघोली व रावतळे कुरुड्गाव अशा एकूण 5 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज राहिल्याने येथे दुरंगी लढती रंगणार आहेत. तर दहीगावने भायगाव, खानापूर, ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी प्रत्येकी तीन उमेदवारी अर्ज निवडणुकीच्या मैदानात असल्याने येथे तिरंगी लढती रंगल्या आहेत. या शिवाय आखेगाव येथे सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी 4 उमेदवारांनी दंड थोपटल्याने येथे चौरंगी लढत रंगली आहे.
तर ग्रामपंचायत सदस्यासाठी जोहरापूर येथे सर्वाधिक 42 उमेदवार निवडणुकीच्या मैदनात उतरले आहेत. तालुक्यातील दहीगावने ग्रामपंचायतीच्या 7 जागा बिनविरोध झाल्या असून त्यात शांताबाई जगन्नाथ मोरे, रुक्मिणी संजय लिंबोरे, मीरा बबन पवार, दिलदार जमादार शेख, राणी विकास गजभिव, सुरेश विश्वनाथ घाणमोडे, संदीप बहिरनाथ गुंजाळ,या 7 जणांचा समावेश आहे. सातही जागा घुले गटाने बिनविरोध पटकावून ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व कायम राखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 मधून सारिका रामदास वाघमारे या बिनविरोध विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनीसांगितले.
गावनिहाय उमेदवारांची संख्या
अशी कंसात जागा जोहरापूर - 42 (9), खामगाव 16 (7), सुलतानपूर 16(8), दहीगाव ने 24(8), प्रभूवाडगाव 19 (9), वाघोली 31(9), भायगाव 20(9), आखेगाव 34(11), रावतळे कुरुडगाव 18(9), खानापूर 21(9), रांजणी 23(9), अमरापूर 32 (11).