शेवगावात गणेशोत्सव व मोहरम पार्श्वभूमिवर प्रात्यक्षिक
सार्वमत

शेवगावात गणेशोत्सव व मोहरम पार्श्वभूमिवर प्रात्यक्षिक

Arvind Arkhade

शेवगाव |वार्ताहर| Shevgav

आगामी काळात येणार्‍या गणेशोत्सव व मोहरम या उत्सवाच्या दिवसात नागरिकांनी करोना संकटाच्या पार्श्वभूमिवर कोव्हिड-19 च्या शासनाच्या नियमानुसार साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी केले आहे.

राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शेवगाव उपविभागातील नेवासा, शेवगाव, पाथर्डी, सोनई, शिंगणापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दंगल काबू प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यावेळी श्री. जवळे दैनिक सार्वमतच्या प्रतिनिधीशी बोलत होते.

यावेळी शेवगाव शहरा लगतच्या आखेगाव रस्त्यावरील मैदानावर झालेल्या दंगल काबू प्रात्यक्षिकासह समोरच्या मोर्चातील जनतेतून होणार्‍या घोषणा आणि दगडफेकीला सामोरे जातानाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

देशात सर्वत्र एकता राहिली पाहिजे. पूर्ण देश एकत्र राहण्यासाठी राष्ट्रीय एकता दिवस पाळला जातो. हा सद्भावना दिवस म्हणूनही पाळला जातो. शेवगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी आभार मानले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com