शेवगावात 56 हजार हेक्टर क्षेत्र 33 टक्के पेक्षा अधिक बाधित

952 शेतकर्‍यांना फटका
शेवगावात 56 हजार हेक्टर क्षेत्र 33 टक्के पेक्षा अधिक बाधित

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील 113 गावातील 80 हजार 508 शेतकर्‍यांचे 56 हजार 122 हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे 33 टक्क्यापेक्षा जास्त तर 444 शेतकर्‍यांच्या 371 हेक्टर क्षेत्रातील विविध पिके 33 टक्क्यापेक्षा कमी बाधित झाल्याचे या अहवालाद्वारे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती तहसीलदार वाघ, गटविकास अधिकारी डोके, तालुका कृषी अधिकारी टकले यांनी सांगितले.

तालुक्यात 1 ऑक्टोंबर ते 18 ऑक्टोंबर या दरम्यान झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेती पीक व फळ पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आपआपल्या परिसराचा नुकसानीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना तालुक्यातील सर्व कामगार तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांना देण्यात आल्या असून तालुक्यात शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु झाल्याची माहिती तहसीलदार छगन वाघ, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी दिली.

तालुक्यात झालेल्या नुकसानीचा नजर अंदाज प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी तसेच जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वरील कालावधीत तालुक्यातील विविध मंडलात अतिवृष्टी व जोरदार पावसामुळे शेतक-यांच्या कापूस, तूर, बाजरी, सोयाबीन, कांदा आदी पिकांसह फळ बागा बाधित झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com