शेवगाव : खून करून मृतदेह भातकुडगावात पुरला

शेवगाव : खून करून मृतदेह भातकुडगावात पुरला

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शिरूर कासार (जि. बीड) येथील एका सोनाराचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला, व त्यानंतर मृतदेह शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे एका शेतात पुरण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवार (20 मे) रोजी घडली.

ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचे शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असल्याने त्याने सोने खरेदीचा बहाना करून सोनार विशाल कुलथे यांच्याशी संपर्क केला. माझे लॉकडाऊनमध्ये लग्न झाले. त्यामुळे जास्त सोन करायचे आहे, असे सांगून ऑर्डर देण्यात आली. तसेच, दुकानातील तयार असलेले सोने घेऊन माझ्या दुकानात ये, असे गायकवाड म्हणाला. कुलथे हा सोने घेऊन गायकवाड याच्या सलुन दुकानात गेला. मात्र, त्याच ठिकाणी त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेऊन गायकवाड याचा साथीदार केतन लोमटे याला ताब्यात घेतले. लोमटे यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली.

मात्र, त्याला पोलीस खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला व गुन्ह्याची कबुली देत ज्या ठिकाणी मृत्यूदेह पुरण्यात आला ते ठिकाण पोलिसांना दाखवले. हे ठिकाण भातकुडगाव येथील दत्तात्रय गायकवाड यांच्या शेतात होते. दरम्यान, शेवगाव पोलीस, शिरूर पोलीस, महसूल शेवगाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. खड्ड्यातून मृतदेह काढून तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com