शेवगाव तालुक्यात आणखी 26 करोना रुग्णांची भर

एकूण बाधितांची संख्या 347 : प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा
शेवगाव तालुक्यात आणखी 26 करोना रुग्णांची भर

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव तालुक्यात नव्याने 26 करोना बाधित रुग्ण आढळले. यामध्ये शेवगाव शहरातील 14 ग्रामीण भागातील 12 रुग्णांचा समावेश आहे. यापैकी 1 जण पाथर्डी येथील रॅपिड टेस्टमध्ये तर 1 व्यक्ती नगर येथे खाजगी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत करोना बाधित आढळले. यामुळे शेवगाव तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 347 झाली आहे.

बुधवारी दिवसभरात शेवगाव शहरासह तालुक्यातील 198 जणांच्या अँटीजेन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये 172 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एका जणाचा नगर येथील खाजगी प्रयोगशाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे शेवगाव तालुक्यातील करोना बाधितांची एकूण संख्या 347 झाली आहे.

गुरूवारी आढळलेल्या करोना बाधितांमध्ये शेवगाव शहरातील 14 जणांचा समावेश आहे. यामध्ये सम्राट अशोकनगर येथे 2, शास्त्रीनगर येथे 1, विद्यानगर 2, मिरीरोड कोर्टाजवळ 1, खंडोबानगर 1, कोरडेवस्ती 2, माऊलीनगर 1, नेहरूनगर 1, जुना प्रेस 1, काझीगल्ली 1, ज्ञानेश्वरनगर 1 असे एकूण 14 करोना बाधित आढळले.

तर तालुक्यातील घोटण येथे 2 (1 खाजगी लॅब तपासणी), दहिगावने 3, रांजणी 2, चापडगाव 3, कोळगाव 2 तर ढोरजळगाव येथे 1 जण पाथर्डी येथे करण्यात आलेल्या तपासणीत करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.

शहरासह तालुक्यात वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नेहमी मास्क वापरावा, सॅनिटायझर वापरावे, नेहमी वेळोवेळी स्वच्छ हात धुवावे व सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन तहसीलदार अर्चना पागिरे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com