शेवगाव तालुक्यात करोनाचे चार रुग्ण

बुस्टर डोसनंतरही काही वृद्धांना करोना
शेवगाव तालुक्यात करोनाचे चार रुग्ण

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण परिसरात करोना नियंत्रणात आला असला तरी करोना पूर्णपणे संपलेला नसून बदलत्या वातावरणात शहर व तालुक्यात करोनाचे रुग्ण अजूनही आढळून येत असून सध्या शेवगाव शहरात दोन तर तालुक्यातील बोधेगाव व वडुले बु. येथे प्रत्येकी एक असे एकूण चार अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असल्याची माहिती तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागातून सांगण्यात आली.

बुस्टर डोस घेतलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांना अजूनही करोनाचा संसर्ग सुरू असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली असून ज्येष्ठ नागरिकांत चिंतेचे सावट पसरले आहे. करोनाच्या पहिली व दुसरी अशा दोन्ही डोस नंतर बुस्टर डोस घेतलेल्या ज्येष्ठांना करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अतिशय अल्प असल्याने आरोग्य विभागाच्या मोफत बुस्टर डोस सुविधेचा संबंधितांनी लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संकल्प लोणकर यांनी केले आहे.

शेवगाव तालुक्यात केवळ 12 हजार 329 पात्र लाभार्थ्यांनी करोनाचा बुस्टर डोस घेतला असून बुस्टर डोस घेणार्‍या पात्र लाभार्थ्यांची संख्या केवळ 2 ते 3 टक्के आहे. आरोग्य विभागाच्या मोफत बुस्टर डोस योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांनी आपले आरोग्य सुरक्षित व ठणठणीत राहावे यासाठी आरोग्य विभागाच्या मोफत बुस्टर डोस योजनेचा सत्वर लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लोणकर, आरोग्य विस्तार अधिकारी, डॉ.सुरेश पाटेकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रामेश्वर काटे यांनी केले आहे.

दीड लाख नागरिकांनी घेतला दुसरा डोस

तालुक्यात 18 वर्षांवरील करोनाचा डोस घेण्यासाठी 1 लाख 94 हजार 373 पात्र लाभार्थ्यांपैकी तालुक्यातील 1 लाख 94 हजार 180 पात्र लाभार्थ्यांनी करोनाचा पहिला डोस घेतला असून 1 लाख 57 हजार 159 पात्र लाभार्थ्यांनी करोनाचा दुसरा डोस घेतला आहे. तालुक्यात करोनाच्या पहिला डोसचा जवळपास 100 टक्के पात्र लाभार्थ्यांनी तर दुसर्‍या डोसचा पात्र लाभार्थ्यांपैकी 81 टक्के पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लोणकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com