
शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करुण हिंदु धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याने शेवगाव शहरात तणाव निर्माण झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल करणार्या दोन समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि.13) सर्व संघटनांच्या वतीने शेवगाव शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
शेवगाव शहरातील दोन समाज कंटकांनी जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीणे शनिवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ मोबाईलवर व्हायरल कल्याने हिंदु धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या. ही चर्चा वार्यासारखी शहरात पसरताच तीव्र संताप व्यक्त होत राहिला. रात्री सर्व हिंदु धर्माचे रक्षक, शिवप्रेमी शेवगाव पोलीस ठाण्यात जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तर कारवाईच्या मागणीसाठी काही युवक रस्त्यावर उतरले. याची माहिती मिळताच शेवगाव, पाथर्डी, नेवासा, सोनई येथील पोलीस पथकासाह प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी संदिप मिटके शेवगावला दाखल झाले. उपस्थितांच्या तिव्र भावणा लक्षात घेऊन रात्री 1 वाजता हा व्हिडीओ व्हायरल करणार्या दोन समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
रविवार या घटनेची माहिती मिळताच शहरात सोशल मिडीयातुन संतप्त भावना उमटल्या गेल्या. या घटनेच्या निषेधार्थ सोमवार शहर बंदची हाक देण्यात आली असून आक्षेपार्ह मजकुर पसरविण्यामागे मुख्य सुत्रधार कोण आहे याचा शोध घेऊन त्यास त्वरीत अटक करावी अशी मागणी विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.