शेवगाव येथे 25 हजारांची लाच स्वीकारताना पोलीसच अडकला
सार्वमत

शेवगाव येथे 25 हजारांची लाच स्वीकारताना पोलीसच अडकला

Arvind Arkhade

बोधेगाव|वार्ताहर|Bodhegav

तक्रारदाराच्या मुलाच्या 353 च्या गुन्ह्याच्या जामिनासाठी कोर्टात से रोपोर्ट पाठविण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी साहेबांना सांगतो असे म्हणून मोबदल्यात 25 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ आसाराम सोनटक्के (वय 32) यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल भादवि 353 गुन्ह्यात मुलाच्या जामिनासाठी कोर्टात से रिपोर्ट पाठविण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी साहेबाना सांगतो असे म्हणून, त्याच्या मोबदल्यात साहेबांसाठी म्हणून 24/07/2020 रोजी आयोजित लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान पंचा समक्ष 25 हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

काल आरोपी सोमनाथ आसाराम सोनटक्के (वय 32, पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर 2568, नेमणूक शेवगाव पोलीस स्टेशन, रा. डॉ. बटुळे यांच्या घरात (भाड्याने), खंडोबानगर, अखेगाव रोड, शेवगाव) यांच्याविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सुनील कडासने पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक निलेश सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक, हरीश खेडकर, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. अहमदनगर यांच्या पथकाने शुक्रवारी (दि. 32 जुलै) ही कारवाई करण्यात आली. योगायोग असा की तक्रारदार व आरोपी हे दोघेही मुंगी या एकाच गावाचे रहिवासी आहेत. लगतच शेत जमीन असलेले बोलले जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com