शेवगावच्या बोगस खरेदी व्यवहारांचे होणार पुनर्निरीक्षण

विभागीय आयुक्त गमे यांचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश
शेवगावच्या बोगस खरेदी व्यवहारांचे होणार पुनर्निरीक्षण

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव येथील बेकायदेशीर गुंठेवारी बोगस खरेदी विक्री व्यवहार प्रकरणी तहसीलदार यांच्या खोट्या सही शिक्क्याने आदेश पारीत झाले असल्यास फौजदारी गुन्हे दाखल करून या प्रकरणातील फेरफार नोंदी व आदेश पुनर्निरीक्षणामध्ये घेण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत .

भाजपा अध्यक्ष अरुण मुंढे यांनी केलेल्या बेकायदा बोगस अकृषिक भूखंड प्रकरणाच्या चौकशी मागणीवरून जिल्हाधिकारी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. या अहवालात काही त्रुटी निष्पन्न झाल्या होत्या. मुंढे यांच्या मागणीची दखल घेऊन विभागीय आयुक्त यांनी अहवालात काही प्रकरणात तहसील व तलाठी कार्यालयात असणार्‍या स्थळप्रतीत तफावत दिसून आली.

काही गट नं. रहीवाशी विभागात समाविष्ठ नसल्याने तहसीलदार मार्फत अकृषिक जमीन आदेशात अनियमीतता असल्यामुळे त्या तहसीलदांरावर प्रशासकीय कारवाई आवश्यक आहे. काही प्रकरणांच्या नोंदी कार्यविवरण नोंदवहीमध्ये नाहीत. 51 प्रकरणांच्या संचिका, आदेश, सनद, पत्र हे तहसील कार्यालयात उपलब्ध नाहीत. यासह अकृषिक करण्यात आलेले क्षेत्र रहिवास विभागात समाविष्ठ नसल्यास त्याच्या फेरफार नोंदी उपविभागीय अधिकारी यांनी पुनर्निरीक्षणामध्ये घेऊन त्या रद्द कराव्यात.

या प्रकरणाशी संबंधित फेरफार नोंद पुनर्निरीक्षणामध्ये घेऊन त्या रद्द कराव्यात. या प्रकरणाशी संबंधित फेरफार नोंदी व आदेश पुनर्निरीक्षणामध्ये घेण्यात यावेत, तहसीलदार यांच्या खोट्या स्वाक्षरीने आदेश पारीत झाले असल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्याचे आदेश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.

अधिकारी, कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई

तलाठी व मंडळाधिकारी यांनी फेरफार नोंद घेताना व ती मंजूर करताना सत्यता पडताळणी केली नाही. केवळ पत्राच्या आधारे या नोंदी घेण्यात आल्याने संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा अहवाल अपर जिल्हाधिकारी यांनी दिला होता. त्या अहवालानुसार संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध तातडीने शिस्तभंगाची कारवाई करून एका आठवड्यात याचा अहवाल सादर करावा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com